Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार, अमरावतीतून देवेंद्र फडणवीसांचे शेतकऱ्यांना वचन

7

Devendra Fadnavis Promises to Farmers at Amravati : कापूस आणि सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार, असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Lipi

अमरावती : मागच्या काळात कापूस, सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना आणली. हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली, आम्ही एवढ्यावरच थांबलेलो नाही. येत्या काळात हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार, असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातील महायुती समर्थित उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ गोपालनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हितासाठी कटिबद्ध असल्याचे वचन दिले आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर गुजरातचे मंत्री ऋषिकेश पटेल, खासदार अनिल बोंडे, मध्य प्रदेशचे माजी आमदार आत्माराम पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
Devendra Fadnavis: फडणवीस मराठवाड्यात, आरक्षण आंदोलनातील बड्या नेत्याची अचानक भेट; चर्चेनंतर निघताना सूचक संकेत
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांसाठी मोफत विजेचा निर्णय घेतला. सरकारकडून शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी ही वीज पुरविली जाईल. रात्री शेतावर पाणी देण्यासाठी जाण्याचीही गरज पडणार नाही. दिवसा शेतात काम करीत असतानाच सिंचन करणे शक्य होईल. कारण दिवसा १२ तास वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी वेगळी कंपनीच उभारली आहे.

महाविकास आघाडीवाल्यांच्या डोक्याचे नटच कसतो!

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना ओवाळणी म्हणून दर महिन्याला १५०० रुपये देतो. आम्ही पैसे देऊ असे सांगताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेड्यात काढले, अनेक वल्गना केल्या. हायकोर्टात गेले. कोर्टाने योजना बंद करण्यास नकार दिला. यानंतर आम्ही त्यांच्या नाकावर टिच्चून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे खात्यावर दिले आहेत. तुमचा आशीर्वाद मिळाला की २१००रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत. महाविकास आघाडी वाल्यांचे हे षडयंत्र थांबविण्यासाठी त्यांच्या डोक्याचे नटच कसतो. मग लाडक्या बहिणींविषयी असले विरोधी विचार त्यांच्या डोक्यात येणार नाही, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शेतकरी म्हणाले, आता पडक्या दराची चिंता मिटली!

बाजारात भाव कोसळले की, कुठलेही संरक्षण मिळत नसल्याने अडचण होत होती. अनेकदा घरात शेतमाल पाडून ठेवावे लागत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हमीभावातील फरकाची रक्कम थेट खात्यावर जमा करण्याची घोषणा केल्याने आमची मोठी अडचण दूर झाली आहे. आता गरज असल्यास कमी भाव असतानाही मालाची विक्री करणे शक्य होईल. हा मोठा दिलासा आहे, अशा शब्दांत अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने या घोषणेनंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.