Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सरवणकर म्हणाले तिहेरी लढतीत अमित ठाकरेंना फायदा, ऑनलाईन पोलचा धक्कादायक अंदाज

4

Mahim Vidhan Sabha Nivadnuk :शिवसेना माहीमची जागा सोडण्यास तयार होती. परंतु राज ठाकरे यांनी भेट नाकारल्यामुळे पक्षाने उमेदवार कायम ठेवल्याचा दावा आता केला जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून सदा सरवणकर, तर शिवसेना (उबाठा) पक्षाचे महेश सावंत इथे रिंगणात आहेत. मूळ शिवसेना रुजली ती दादर-माहीममध्येच. सेनेच्या या बालेकिल्ल्यात विद्यमान आमदार असलेल्या सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा व मनसेला पाठिंबा द्यावा, यासाठी विविध स्तरांवर हालचाली झाल्या. मात्र, माघार घेण्याची तयारी असलेल्या सरवणकर यांना राज ठाकरेंनी भेट नाकारली, त्यानंतर त्यांनीही रिंगणात पाय रोवून राहण्याचा निर्धार पक्का केला. अशात आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेना माहीमची जागा सोडण्यास तयार होती. परंतु राज ठाकरे यांनी भेट नाकारल्यामुळे पक्षाने उमेदवार कायम ठेवल्याचा दावा आता केला जात आहे. इतकंच नाही, तर दुहेरी लढत झाली असती, तर शिवसेनेची सर्व मतं ठाकरेंच्या उमेदवाराला गेली असती, पण तिहेरी लढतीत अमित ठाकरेंना फायदा होईल, असा दावाच सरवणकरांनी केला.
Rupesh Mhatre : वरळी-वांद्रेत सेटिंगचा आरोप, माजी आमदाराला ठाकरेंनी बाहेर काढलं, शिंदेंनी दोन दिवसात पक्षात घेतलं

काय आहेत पोलचे अंदाज?

आता आमची मुंबई (_aamchi_mumbai_) आणि दादर मुंबईकर (dadarmumbaikar) या इन्स्टाग्राम पेजवरुन ऑनलाईन मतदान घेण्यात आले आहे. यामध्ये अमित ठाकरे (मनसे), महेश सावंत (ठाकरे गट), सदा सरवणकर (शिवसेना) आणि नोटा/इतर/अपक्ष असे पर्याय देण्यात आले आहेत. ८ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या या ऑनलाईन पोलचे ९ नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंतचे अंदाज समोर आले आहेत.

या अंदाजानुसार, अमित ठाकरे यांना सर्वाधिक म्हणजे ५४ टक्के मतं मिळाली आहेत. महेश सावंत यांना ३२ टक्के मतदारांनी कौल दर्शवला आहे. तर सदा सरवणकर यांना सर्वात कमी म्हणजे १२ टक्के मतं मिळाली आहेत. इतरांना २ टक्के पसंती आहे. ५ हजार ९५२ जणांनी आपले मत नोंदवले आहे.

Mahim Online Poll : सरवणकर म्हणाले तिहेरी लढतीत अमित ठाकरेंना फायदा, ऑनलाईन पोलचा धक्कादायक अंदाज, फक्त १२ टक्के…

या मतदानाची टक्केवारी आणि निकाल कुठल्याही क्षणी बदलू शकतात, त्यात अगदी उलटफेरही पाहायला मिळू शकतो. विशेष म्हणजे ऑनलाईन व्होटिंग असल्यामुळे यात मतदारसंघाबाहेरील युजर्सनीही आपली मतं नोंदवली आहेत. त्यामुळे हे आकडे प्रत्यक्ष मतदानाचे अजिबात निदर्शक नाही. ही आकडेवारी फसवीही असू शकते.

Mahim Online.

कोणाला कौल?

दादर, माहीममधला मतदार हा सुजाण आणि सुशिक्षित आहे. युवा मतदारांचा टक्काही इथे मोठा आहे. त्यामुळे तरुण नेतृत्वाचा विचार करताना अमित यांना प्राधान्य देण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेतील नेते अमित यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असतानाच सूत्रे फिरली. त्यामुळे आता ते काय धोरणात्मक निर्णय घेतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. परस्परविरोधात उभ्या ठाकलेल्या कोणत्या सेनेचा झेंडा मतदार हाती घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.
Sada Sarvankar : उमेदवारी मागे घेण्याचा प्रचंड मोठा दबाव, सरवणकरांनी पहिल्यांदाच माघार न घेण्याचं कारण सांगितलं

मतदारांची संख्या

पुरुष : १ लाख १२ हजार ६३८
महिला : १ लाख १२ हजार ६५७
तृतीयपंथी : ७८

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.