Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुलासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल आमदार अशोक पवार व्यथित; म्हणाले, ‘घृणास्पद प्रकार करुन कुटुंबाला वेठीस धरायचंय का?’

9

Ashok Pawar Commented on Son Rushiraj Pawar Case: पुण्यातील शिरुरचे आमदार अशोक पवार यांचे पुत्र ऋषीराज पवार याचं अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकारावर आमदार अशोक पवार यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत राष्ट्रवादी शरद पवाराच्या गटाच्या आमदार पुत्रासोबत धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील शिरुरचे आमदार अशोक पवार यांचे पुत्र ऋषीराज पवार याचं अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऋषीराजचे विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. याप्रकरणी ऋषिराज पवार यांनी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणेही गाठले. तर विधीज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकाराचा व्हिडीओ माध्यमांसमोर दाखवत माहिती दिली. या सर्व प्रकारावर आमदार अशोक पवार यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

अशोक पवारांनी मुलासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत निषेध व्यक्त केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी
‘दुर्दैवी.. दुःखद.. वेदनादायी.. घृणास्पद.. निंदनीय..’ अशा पाच शब्दांत घटनेबद्दल प्रतिक्रिया मांडली.

व्हिडीओच्या माध्यमातून अशोक पवार म्हणाले, आज दुर्दैवी घटना घडली, घृणास्पद म्हणजे विरोधी माणसं कुठल्या थरापर्यंत जातात. आज माझ्या मुलाला मोटारसायकलवर असताना एकाने प्रचार करण्यासाठी जवळच्या वस्तीत नेलं, तिथं गेल्यावर त्याला कोंडलं. त्याचा गळा पट्टीनं की फडक्यानं आवळण्यात आला. त्याला सांगितलं तू कपडे काढ, एका महिलेला विवस्त्र करुन अत्यंत घृणास्पद प्रकार केला.

‘आमच्या जीवनामध्ये आम्ही जे चांगलं वागतो, समाजाशी एकरुप होतो. पण या घटनेने मनाला वेदना झाल्या, विरोधक कुठल्या थराला जाणार आहेत ही लोकं, अशी भावनाही अशोक पवारांनी व्यक्त केली.
आमदार अशोक पवारांच्या मुलाचं अपहरण; विवस्त्र करुन महिलेसोबत VIDEO काढला, घटनेनं खळबळ
पवार पुढे म्हणाले, ‘या घटनेनंतर काही लोकं भेटायला आले. ते म्हणाले, बापू त्या पोरांना माफ करा. पण अरे काय चाललंय, हा प्रकार काय आहे. खरं म्हणजे आमच्या सारख्याचं मन एकदम बेचैन झाले आहे. लोकशाहीत निवडणूक लोकशाही पद्धतीनं तुम्ही लढा, असे घृणास्पद प्रकार करुन आमच्या कुटुंबाला वेठीस धरायचं आहे का, अत्यंत निंदनीय ही गोष्ट आहे. म्हणजे काळ यांना माफ करणार नाही.’

पोलीस खात्याला विनंती करत पवार म्हणाले की, या प्रकरणाची बारकाईने चौकशी करा, याचा कोण सूत्रधार आहे हे शोधला पाहिजे, समाज यांना माफ करणार नाही. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना की ज्यांना कुणी असं कृत्य करण्यास भाग पाडलं असेल तो खरा माणूस शोधणं पोलीस खात्याचं लक्ष्य असलं पाहिजे. कारण यांना माफ केलं नाही पाहिजे. ‘कुटुंबाला बदनाम करणं दु:खद अशी घटना आहे,’ असेही अशोक पवार म्हणाले.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.