Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

माझ्या एन्काऊंटरचा कट होता, एका पोलीस अधिकाऱ्यानं मला…; सदाभाऊ खोत यांच्या दाव्यानं खळबळ

4

Sadabhau Khot: २०१२ मध्ये माझ्या एन्काऊंटर डाव आखण्यात आलेला होता, असा खळबळजनक दावा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत असताना माझ्या एन्काऊंटरचा डाव होता. तसे आदेश वरुन पोलिसांना देण्यात आलेले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट शेतकरी नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत खोतांनी केलेल्या गौप्यस्फोटांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

‘२०१२ ला इंदापूरला ऊसाचं आंदोलन सुरु होतं. वसवडे गावात चंद्रकांत नलावडे हा शेतकरी मजुराचा मुलगा, तो टेम्पोच्या आडोशाला राहून आंदोलन बघत होता. समोरुन जाऊन त्याला गोळी घालण्यात आली. त्यावेळी मला येरवड्याच्या तुरुंगात ठेवलं होतं. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर शेतकरी उतरले होते. तेव्हा मला पोलिसांचा निरोप आला, तुमचा जामीन तुम्ही स्वीकारा. बाहेर येऊन तुम्ही शांततेचं आवाहना करा. मी जामीन स्वीकारला, बाहेर आलो. बाहेर पोलिसांच्या तीन-चार टोयॉटो कार लागलेल्या होत्या. यात बसा, यात बसा, असं पोलिसच मला सांगत होते. यांनी माझ्यासाठी इतक्या चांगल्या गाड्या कशासाठी आणल्या, असा प्रश्न मला पडला,’ अशा शब्दांत १२ वर्षांपूर्वी घडलेली घटना खोत यांनी सांगितली. त्यावेळी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार होतं.
एकमेका सहाय्य करु, दोघे गाठू विधानसभा? ठाकरेंच्या समझोत्याची चर्चा; माहीम, वरळीत चाललंय काय?
‘मी आज त्या डीवायएसपीचं नाव घेणार नाही, कारण तो आता ऍडीशनल एसपी आहे. त्याच्या नोकरीवर मला गंडांतर आणायचं नाही. त्यानं मला चालत चालत हळूच सांगितलं, भाऊ जिथे जिथे आंदोलनात दंगल चाललीय, अशा एक दोन पॉईंटवर न्यायचंय आणि तुमचा एन्काऊंटर करायचाय. तुम्ही प्लीज या गाडीत बसू नका. मग मी दौंडच्या कार्यकर्त्याच्या गाडीत बसलो. सगळ्या रस्त्यारस्त्याला मला अडवलं गेलं होतं,’ असा दावा खोत यांनी केला आहे.
बाहेरचे लोक इकडे येऊन…; योगींच्या घोषणेला अजित पवारांचा विरोध; शिंदेसेनेचा फुल्ल सपोर्ट
२०१२ मध्ये नेमकं काय घडलं होतं, तेव्हा परिस्थिती नेमकी कशी होती, हेदेखील खोत यांनी सांगितलं. ‘त्यावेळी आमच्याकडचे कारखानदार प्रचंड चिडलेले होते. ५००-६०० रुपये असलेला ऊसाचा दर आम्ही २५०० ते ३००० रुपयांवर नेला होता. त्यामुळे कारखानदार संतापले होते. कारखानदारांच्या सत्तेला सुरुंग लागणार होता,’ असं खोत यांनी सांगितलं. २०१२ मध्ये खोत राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होते.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.