Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जीवघेणा ठरला नायलॉन मांजा! मांडीला गंभीर दुखापत, ९ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू, नाशिकमधील घटना

7

Nashik Child Death : माळी गल्लीत काही मुलगे पतंग उडवत होते. त्यावेळी विष्णू तिथे पाहण्यासाठी गेला असताना नायलॉन मांजा त्याच्या मांडीत अडकला. गुडघ्या मागे गंभीर जखमी झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला.

महाराष्ट्र टाइम्स
nylon manja

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : वडाळा गाव परिसरातील माळी गल्ली येथे पतंग उडविताना नायलॉन मांजामुळे मांडीला गंभीर दुखापत होत झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे नऊ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विष्णू संगम जोशी असे मृत मुलाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. ८) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नेमकं काय घडलं?
शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास माळी गल्लीत काही मुलगे पतंग उडवत होते. त्यावेळी विष्णू तिथे पाहण्यासाठी गेला असताना नायलॉन मांजा त्याच्या मांडीत अडकला. गुडघ्या मागे गंभीर जखमी झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. त्याचा मावसभाऊ गणेश भदरगे याने त्याला डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान विष्णूचा मृत्यू झाला. गंभीर स्वरुपाच्या जखमेमुळे अतिरक्तस्त्राव होत विष्णूचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विष्णूची आई मजुरी करते. त्याला लहान भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करून नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली.

नायलॉनचा सर्रास वापर
गतवर्षी नायलॉन मांजा विक्री व वापरणाऱ्यांना पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केली होती. काही विक्रेत्यांना तडीपारदेखील करण्यात आले. मात्र, आता पुन्हा नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू झाला आहे. पंचवटी, वडाळागाव, सिडको, सातपूर, उपनगरमध्ये तरुणांसह लहान मुलांच्या हातात नायलॉन मांजा असल्याचे दिसते. शुक्रवारी (दि. ८) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गोदाघाटावरही लहान मुले पतंग उडवत असताना नायलॉन मांजाचा वापर करीत होते. त्यामुळे जानेवारीऐवजी आतापासूनच नायलॉनच्या बाजारावर पोलिसांनी रोख लावण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
चाळीस दरोडेखोरांनी पक्ष लुटला; बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांची शिंदे गटावर टीका
गतवर्षी १९ तरुण जखमी
सन २०२४ मध्ये संक्रांतीनिमित्त झालेल्या पतंगबाजीमुळे शहरात १९ तरुण जखमी झाले होते. पतंग उडविताना गच्चीवरून पडल्याने सातपूर परिसरात मुलगाही गंभीर जखमी झाला होता. यावर्षी नायलॉन मांजाने मुलाचा बळी घेतला आहे.
आमच्या योजना बंद होणार नाहीत; Ladki Bahin Yojanaवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान
गतवर्षी ४२ जण तडीपार
नायलॉन व इतर घातक मांजाची विक्री, साठा करणे अथवा तो जवळ बाळगणे यावर बंदी लागू करून जानेवारी २०२४ मध्ये पोलिस आयुक्तालयाने १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवसांत तब्बल ४२ जणांना तडीपार केले होते. त्यांना वीस दिवस शहरासह जिल्ह्यात वावरण्यास व मुक्कामास प्रतिबंध करून पोलिसांनी सणाचा ‘धागा’ सुरक्षित केला होता. यावर्षी अशी कामगिरी आतापासून करायला सुरुवात केली, तर नायलॉन मांजा विक्रीला आळा घालता येईल. नायलॉनचा साठा करून नाशिकमध्ये डिसेंबरपासून विक्री सुरू होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.