Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
PM Modi Dhule Rally : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात प्रचारसभांचा धडाका शुक्रवारी धुळे, नाशिक येथून सुरू केला. यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांनी लक्ष्य केले. काँग्रेसने सत्तेसाठी ओबीसींमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र आखले आहे, असा आरोप त्यांनी केला.
‘बटेंगे तो कटेंगे’ वरून वाद टाळताना ‘हम एक है तो सेफ है’ असा नवा नारा पंतप्रधान मोदी यांनी या वेळी दिला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजारांऐवजी १५ हजार रुपये दिले जातील, असे आश्वासन देत सोयाबीन, कापूस, ऊस आणि कांदा उत्पादकांना सरकारकडून अधिक न्याय देण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. मोदी यांनी नाशिक व धुळ्यातील दोन्ही सभांमध्ये काँग्रेस आणि राहुल गांधी यांनाच लक्ष्य केले. मात्र, त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करण्याचे टाळले. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये तपोवन परिसरातील मोदी मैदानावर, तर धुळे येथील खान्देश गोशाळा मैदानावर शुक्रवारी (दि. ८) जाहीर सभा झाली. या वेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचा पतंप्रधान झाल्याने काँग्रेसच्या पोटात खुपत आहे. ओबीसींवरील राग व्यक्त करण्यासाठीच ओबीसींच्या जातीपातीत भांडणे लावण्याचे, सत्तेसाठी ओबीसींमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र काँग्रेसने आखले आहे. त्यामुळे जातींना एकमेकांविरोधात लढवण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप करीत ‘हम एक है तो सेफ है’चा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक, धुळे येथे शुक्रवारी दिला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजारांऐवजी १५ हजार रुपये दिले जातील, असे जाहीर करीत सोयाबीन, कापूस, ऊस आणि कांदा उत्पादकांना सरकारकडून अधिक न्याय देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
नरेंद्र मोदी, अमित शहांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? शरद पवार यांचा वर्ध्यात सवाल
मोदी म्हणाले, की नागपूर येथे काँग्रेसच्या युवराजांच्या (राहुल गांधी) हातात संविधानाच्या नावाखाली कोऱ्या पानांचे पुस्तक असल्याचे दिसून आल्याने त्यांची पोलखोल झाली आहे. आम्ही संविधानाचा सन्मान करतो. काँग्रेस व त्यांच्या सहकारी पक्षांनी ७५ वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू होऊ दिले नाही. काँग्रेसने नेहमीच दलित, शोषित, आदिवासी आणि ओबीसींना आरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असून, ओबीसीमध्ये फूट पाडणाऱ्या काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. तसेच राज्याच्या विकासासाठी पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आणा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
चाळीस दरोडेखोरांनी पक्ष लुटला; बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांची शिंदे गटावर टीका
मोदी म्हणाले…
■जातीजातींत भांडणे लावणाऱ्या काँग्रेसपासून सावध राहा
■लाडकी बहीण योजना बंद करण्याचा मविआचा डाव
■जगातील कोणतीही शक्ती जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करू शकणार नाही
■प्रभू रामाच्या पवित्र नगरीला माझा नमस्कार
■ शेतकऱ्यांना आता १२ हजार नव्हे, तर १५ हजार सन्मान निधी
■ काँग्रेस आता ऑल इंडिया काँग्रेस नव्हे, तर परजिवी झाला आहे
■महायुतीचे घोषणापत्र, तर काँग्रेसचे घोटाळापत्र !
दाऊद अन् बिष्णोईचे टी-शर्ट विकणं पडलं महागात; ‘या’ ऑनलाइन विक्री करणाऱ्यांना वेबसाइट्सवर गुन्हा दाखल
‘वाढवण’जवळ विमानतळ करणार
‘औद्योगिक विकास, परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. मागील तीन महिन्यांत सर्वांत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. स्टील प्रोजेक्ट, इलेक्ट्रिक वाहन उद्योग, ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट असे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत. देशातील सर्वांत मोठे वाढवण बंदर महाराष्ट्रात बनत आहे. पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात तयार होत आहेत. वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला आलो होतो, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते, की तेथे एक विमानतळ हवे. तेव्हा मी शांत राहिलो; पण महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल, तेव्हा ही मागणी पूर्ण करण्यात येईल,’ अशी घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी केली.