Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
PM Modi On Congress: अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींमध्ये भांडणे लावून स्वत:चा राजकीय फायदा करून घेतला,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महायुतीच्या प्रचारसभांमध्ये केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अकोला आणि नांदेड येथे प्रचारसभा घेतल्या. त्या वेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले. ‘नेहरू ते आत्ताच्या काँग्रेस नेतृत्वापर्यंत सगळ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अपमान केला. काँग्रेसने निवडणुकीमध्ये डॉ. बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करून त्यांचे राजकारण संपवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी पूजनीय आहेत. त्यांच्या पंचतीर्थांचे दर्शन घेऊन मी नतमस्तक झालो. या ठिकाणी काँग्रेस नेते गेले होते का,’ असा प्रश्न मोदी यांनी अकोल्यातील सभेत केला. ‘काँग्रेसचे घोषणापत्र नव्हे, तर घोटाळापत्र आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
‘महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत असताना कर्नाटकातील मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. काँग्रेसशासित हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक ही तीन राज्ये गांधी कुटुंबीयांचे एटीएम आहेत,’ असा आरोपही मोदी यांनी केला. ‘अकोल्यातील सभा ९ नोव्हेंबरला होत आहे. आजच्या दिवशी २०१९मध्ये राममंदिर प्रकरणात न्यायालयाचा निर्णय आला होता. त्या वेळी देशातील सर्वांनी एकतेचे दर्शन घडवले होते,’ असे मोदी यांनी अधोरेखित केले.
जीवघेणा ठरला नायलॉन मांजा! मांडीला गंभीर दुखापत, ९ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू, नाशिकमधील घटना
राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे
‘जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे षड्यंत्र यशस्वी झाल्यास डॉ. बाबासाहेबांचे संविधान पुन्हा काश्मीरबाहेर जाईल. मात्र, ते आम्ही होऊ देणार नाही. राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये राज्यघटना लागू होऊ दिली नाही,’ अशी टीका मोदी यांनी केली. ‘केंद्र सरकारने व राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हीत जपले. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत दीड कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला. त्यातील दीड लाख शेतकरी नांदेडचे आहेत,’ असे मोदी म्हणाले. ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा,’ असे आवाहनही त्यांनी केले.
आमच्या योजना बंद होणार नाहीत; Ladki Bahin Yojanaवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान
मोदींनी केली कामे अधोरेखित
– केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक प्रकल्प मंजूर केले
– महाराष्ट्रातील बंदरासाठी ८० हजार कोटींची तरतूद केली
– देशात गरिबांसाठी चार कोटी पक्की घरे बांधली. आणखी तीन कोटी घरे बांधणार
– ७० वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत आरोग्य सुविधा देत आहोत