Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रत्नागिरीमध्ये विचित्र अपघात, एसटी, कार आणि ट्रकची जोरदार धडक, लाडकी बहीण योजनेवरुन महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य
Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
२. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अजित पवार गटात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील नाशिक आमदारांविरोधात प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरणार आहेत. शरद पवार हे १२ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी सहा जाहीर सभा घेणार आहेत.
३. ”लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करू, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळला असून या वक्तव्याविरोधात काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी जोरदार हल्लाबोल करत निषेध व्यक्त केला आहे. बातमी वाचा सविस्तर…
४. जामीन अर्ज वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवण्याच्या पद्धतीविषयी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘जामीन अर्जावर निर्णय घेण्यास एक दिवसाचा जरी विलंब झाला, तरी त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येईल’, असे स्पष्ट निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे.
५. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचा ठपका एका इराणमधील नागरिकावर ठेवण्यात आला आहे. अध्यक्षीय निवडणुकीआधी ट्रम्प यांची हत्या घडवण्याची सुपारी एका सरकारी अधिकाऱ्याने दिली होती, अशी कबुली त्याने दिल्याचे अमेरिकेच्या न्याय विभागाने आरोपपत्रात म्हटले आहे.
६. पुण्यात दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून गुन्हेगारीच्या घटनाही वाढत आहेत. अशातच धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरी एकट्या मुलीला पाहून डिलिव्हरी बॉयची नियत फिरली, घरात कोणी नसल्याचा त्याने फायदा घेतला. आईचे पार्सल आहे म्हणून सांगत घरात गेला मात्र मुलीने आरडाओरडा केल्याने तिथून पळून गेला. ही घटना वाघोली परिसरात घडली. बातमी वाचा सविस्तर…
७.बिग बॉसचे सदस्य असणाऱ्या धनंजय पोवार, इरिना रुडाकोव्हा, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण यांनी सूरजची भेट घेतली. मात्र या घरात त्याच्या सर्वात जवळचे असणारे अंकिंता प्रभू वालावलकर आणि पॅडी कांबळे मात्र त्याच्या भेटीसाठी पोहोचले नाही, याची खंत सूरजच्या मनातही होती. अलीकडेच अंकिताने जेव्हा त्याची भेट घेतली, तेव्हा तिने याविषयी भाष्य केले आहे.
८.आशुतोष राणा हे एक असे व्यक्तिमत्व आहे जे केवळ अभिनयासाठीच नव्हे साहित्य आणि भाषेच्या उत्तम ज्ञानसाठीही ओळखले जातात. चित्रपटात येण्यापूर्वी ते थिएटर आर्टिस्टही होते. इंडस्ट्रीतील अनुभवी कलाकारांच्या यादीत आशुतोषचे नाव घेतले जाते. ते उत्तम कवी आणि लेखकही आहेत. ते आज त्यांचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
९. अभिनेते किरण माने सध्या ‘लय आवडतेस तू मला’ या कलर्स मराठीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याशिवाय सध्या ते राजकारणातही विशेष सक्रिय असतात. मात्र या सर्वांपेक्षा ते सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वाधिक चर्चेत येतात. अलीकडेच त्यांनी केलेली पोस्ट राजकारण किंवा त्यांच्या मालिकेविषययी नाहीये, तर त्यांच्या खास मित्राविषयी आहे.
१०. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. हा सामना रविवारी गेकेबेहारा येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर होणार आहे. यासाठी टीम इंडिया पोहोचली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुसरा सामनाही त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता फारच कमी आहे.