Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, थोडीफार इज्जत वाचली, साताऱ्यातील अजित पवारांचं भाषण चर्चेत

7

प्रचारसभेत अजित पवारांनी उदयनराजेंबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. यामध्ये अजित पवारांनी लोकसभेच्या निकालांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की पिपाणीमुळे लोकसभा निवडणुकीत आमचे राजे वाचले.

Lipi

संतोष शिराळे, सातारा: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराला वेग आला आहे. अवघे दहा अकरा दिवस शिल्लक असताना मोठ्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रचारसभांना राज्यातील प्रमुख पक्षांची नेतेमंडळी सुद्धा हजेरी लावून मतदारांपर्यंत विकासकामे पोहोचवत आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सभा होत आहेत. या रणधुमाळीत रविवारी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार सचिन पाटील कांबळे यांच्या प्रचारार्थ साखरवाडी (फलटण) येथे सभा आयोजित केली होती.

साखरवाडी येथील सभेमध्ये अनेक मान्यवरांची भाषणे झाली. ज्यावेळी अजित पवार यांनी भाषणाला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत कशा प्रकारे अनेक जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले, यावर भाष्य केलं. अनेक महत्त्वाच्या जागांवर कशा पद्धतीने मतं कमी पडली आणि कोणत्या जागांवर आपण सुदैवाने विजयी झालो, यावरही अजित पवार बोलत होते. त्यावेळी विशेष म्हणजे त्यांनी सातारा लोकसभा निवडणुकीवर बोलत असताना पिपाणीमुळे सातारा जागा वाचली, आमचा राजा वाचला, आमचे १३ वे वंशज वाचले, असे भाष्य केले.
Supriya Sule: सरदेसाईंच्या पुस्तकाने भूकंप; सुनेत्रा पवारांचं नाव कशाला, सुप्रिया सुळे भडकल्या, फडणवीसांवर आगपाखड

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवारांनी सहा-सात महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही जागांवरील पराभवाबाबत भाष्य केले. माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भाषणाचा धागा पकडत अजितदादा म्हणाले, “पराभव झाल्यानंतर खचून जायचं नसतं. यश मिळाल्यानंतर हुरळून जायचं नसतं. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा कामाला लागले. आम्हीही विचार केला. आपण एवढे काम करून लोकसभा निवडणुकीत कमी का पडलो, याचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी विचार केला.

अजित पवार हे अल्पसंख्याक, दलित समाजाला आश्वासित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी फेक नरेटिव्हचा महायुतीला मोठा फटका बसला, असा दावा केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील अनेक मतदारसंघातील पराभूत झालेल्या उमेदवारांचा दाखला दिला.

Ajit Pawar: पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, थोडीफार इज्जत वाचली, साताऱ्यातील अजित पवारांचं भाषण चर्चेत

सातारा लोकसभा मतदारसंघातील जागेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “विरोधकांनी कुठनं कुठनं काय कल्पना काढल्या माहिती नाही. झालं आमची वाटच लावली. बारामतीत, माढ्यात आमची वाट लावली. सातारला पिपाणीने वाचवलं. लोकांना तुतारीसारखी पिपाणी दिसली. ३५ ते ४० हजार मतं पिपाणीला गेली. झालं आमचा राजा वाचला, आमचे १३ वे वंशज वाचले. त्यामुळे आमची बाबा, थोडीफार इज्जत वाचली, असा लोकसभा निवडणुकीत निकाल लागला,” असेही अजित पवार म्हणाले.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.