Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Jayant Patil at Junnar Highlights from Vidhan Sabha Election: पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. जुन्ररमधील सभेदरम्यना राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर खोचक टीका केली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडली. यासभेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबोधित केले. यावेळी जयंत पाटील म्हणाले, येथे जुन्नरमध्ये येऊन सभा घेण्याची माझी गरज नव्हती, सभा तर विजयाची घ्यायची असते. आपले उमेदवार हे आपला विश्वास घेऊन पुढे गेले आहेत ते विजयी होतील. या मतदारसंघातून सर्वांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली होती. समोर उभे असलेल्या दोन उमेदवारांनी सुद्धा उमेदवारी मागितली होती. त्यांनी असेही सांगितले पवार साहेबांचा आशीर्वाद असल्याशिवाय जुन्नर विधानसभा निवडणुका लढवता येत नाही आणि विजयी होता येत नाही.
Maharashtra Election: माहीम मोहीम फिस्कटली; पण राज, शिंदेची मोक्याच्या मतदारसंघात गट्टी; ठाकरेंचा शिलेदार अडचणीत?
अतुल बेनकेंनी अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रचारात वापर करण्यावरुन जयंत पाटील यांनी बेनकेंना घेरले आहे. ‘पूर्वी अतुल बेनके आणि अमोल कोल्हे यांची जोडी होती, असाच प्रचार आता अतुल बेनके करत आहेत. लोकसभेला अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी तुम्ही प्रचार केला. शरद पवार यांच्याविरोधात तुम्ही बोलला. पण याचवेळी जुन्नरमध्ये नवीन जोडी तयार झाली. ती म्हणजे अमोल कोल्हे आणि सत्यशील शेरकर… माणसं खूप हुशार आहे जोड्या लावायला आणि जोड्या तोडायला, असे जयंत पाटील म्हणाले.
यासोबतच जयंत पाटील यांनी आगामी सरकारबद्दल देखील मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘सरकार आपलं येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कुकडीच्या नेटवर्कमध्ये पाणी उपलब्ध होणं अवघड आहे. पठारावर पाणी उपलब्ध करण्याची माझी जबाबदारी आहे. आपल्याला कुणाचंही पाणी अडवयाचं नाही. बिबट बाबतीत देखील नुसती घोषणा… बिबट बरोबर राहायची सवय लावली पाहिजे. पण आमचे तर सगळे बिबट निघून गेले, असा टोलाही जयंत पाटील यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला आहे.