Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वडगावशेरीत आरोप-प्रत्यारोपांचे पेटले रान; थेट उमेदवारांच्या मुळावर घाव, दोन्ही राष्ट्रवादीत संघर्ष धारदार

8

Vadgaonsheri Vidhan Sabha NCP: विधानसभा निवजडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान वरिष्ठ नेते सभांमध्ये थेट उमेदवारांच्या दमदाटी करताना दिसत आहेत, तर सभांनंतरही या घटनांचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

Lipi

आदित्य भवर, पुणे : कल्याणीनगर मधील पोर्शे अपघात प्रकरणानंतर वडगावशेरी मतदारसंघ पुण्यातील चर्चेचा केंद्रबिंदु ठरला होता. आता विधानसभा निवजडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान वरिष्ठ नेते सभांमध्ये थेट उमेदवारांच्या दमदाटी करताना दिसत आहेत, तर सभांनंतरही या घटनांचे पडसाद उमटताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपाची नोटीस समोर आली असून, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाते नेते शरद पवारांच्या वडगावशेरीच्या उमेदवारावर थेट हल्लाबोल करताना दिसत आहेत. बापू पठारे यांच्या सुनेने केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवर सुप्रिया सुळे शांत का आहेत? हाच का तुमचा महिला सन्मान? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ट्विटरवरून सुप्रिया सुळे यांना धारेवर धरले आहे. मतदारसंघात उमेदवारांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना, आता कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणला जात आहे. त्यामुळे मतदारसंघातील चुरस अधिक तीव्र झाली आहे.

राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार बापू पठारे, त्यांचा मुलगा रवींद्र पठारे आणि कुटुंबातील इतर पाच जणांवर त्यांच्या सुनेने होत असलेल्या अत्याचाराच्या आरोपांची तक्रार महिला आयोगाकडे केली होती. हा प्रकार २०१९ मध्ये घडला होता, त्यावर महिला आयोगाने दखल घेत आयोगासमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर चंदननगर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीचा मुद्दा पुन्हा उकरून काढत रुपाली चाकणकरांनी पठारे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी वडगावशेरी मतदारसंघात सभा घेत शरद पवारांचे उमेदवार बापू पठारे यांना सज्जड दम दिला होता. त्याच रात्री सुप्रिया सुळे यांनी सभेतून सुनील टिंगरे यांच्यावर शरद पवारांनी नोटीस पाठवल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांचे फैरी झडत आहेत आणि आता कौटुंबिक वादही सार्वजनिकरित्या उघड होत असल्याने वातावरण अधिक तापले आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.