Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लाडकी बहीण संदर्भात केलेले विधान धनंजय महाडकांना भोवले; आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे म्हणत दाखल केला गुन्हा

10

Dhananjay Mahadik News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे राज्यसभेतील खासदार धनंजय महाडिक यांच्याविरुद्ध जुना राडवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lipi

कोल्हापूर (नयन यादवाड): काल (शनिवारी) भाजप नेते राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरुन एका प्रचार सभेत केलेल्या आक्षेपार्य विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. या विधानावरून विरोधक आता महायुतीवर जोरदार निशाणा साधत आहे यामुळे भाजपसह महायुतीला अडचणीच ठरत आहे. अशातच आता धनंजय महाडिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन केल्याचे म्हणत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल फुलेवाडी ता. करवीर येथे महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणारे महिला जर काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत दिसले तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो अशा शब्दांत लाडक्या बहिणींना एकप्रकारे दमच भरला त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली मात्र यानंतर धनंजय महाडिक यांनी त्वरित स्पष्टीकरण देत माफी मागितली.
खबरदार जर असं बोलला तर! राज्यातील राजकीय पक्ष, उमेदवारांना मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला दम; तातडीने निर्णायक कारवाईचा इशारा
मात्र निवडणूक आयोगाने या वक्तव्याचा गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून धनंजय महाडिक यांना आक्षेपार्ह वक्तव्यासाठी नोटीस बजावत खुलासा करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार धनंजय महाडिक यांनी खुलासा सादर केला. यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणुकीचे आचारसंहिता लागली असल्याने धनंजय महाडिक यांनी राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता – २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आल्याने सादर केलेला खुलासा अमान्य करीत धनंजय महडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी भरारी पथकातील अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार भारतीय न्याय संहिता बी एन एन एस २०२३ अंतर्गत १७१ (२) (a) अंतर्गत दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking News: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आजवरचे सर्वात मोठे यश; मुख्य शूटरला उत्तर प्रदेशातून अटक
धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरुन केलेल्या विधानानंतर राजकीय गदारोळ पहायला मिळाला…त्यानंतर धनंजय महाडिक यांनी स्पष्टीकरण देखील दिलं मात्र विरोधकांना टीका करण्यासाठी आयती संधी ही मिळाली. कालपासूनच महाविकास आघाडी मधील नेत्यांनी टीकेचे जोड उठवले असून आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे महिलांनी धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच राजारामपुरी पोलीस ठाण्यात महिलांनी कारवाई व्हावी म्हणत निवेदन देखील देण्यात आले. अशात आता गुन्हा दाखल झाल्याने धनंजय महाडिक आणि भाजपाच्या अडचणी वाढ होणार आहे.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.