Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लाडकी बहीण योजनेवरुन खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य, लाडक्या बहिणी जर…

3

Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana: राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि सत्ताधारी व विरोधक यांच्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

हायलाइट्स:

  • लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांचे फोटो आम्हाला पाठवा
  • त्या लाडक्या बहिणींची आम्ही व्यवस्था करू
  • खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य
Lipi
धनंजय महाडिक लाडकी बहीण योजना

नयन यादवाड, कोल्हापूर : ”लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करू, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळला असून या वक्तव्याविरोधात काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी जोरदार हल्लाबोल करत निषेध व्यक्त केला आहे.राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि सत्ताधारी व विरोधक यांच्यात मुख्यमंत्री माझीलाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. महायुतीने महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देत आहे. तर आताच्या जाहीरनाम्यात महायुतीचं सरकार आलं तर २१०० रुपये देणार असल्याचं म्हटलं आहे. तर महाविकास आघाडी सरकारने देखील त्यांचं सरकार आलं तर दर महिन्याला ३००० रुपये देण्यार असल्याचं जाहीरनाम्यात म्हटलं आहे. या योजनाना घेऊन महायुतीतील प्रत्येक उमेदवार आणि नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत. अशातच आता कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी चक्क ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवरुन महिलांना जाहीर सभेत स्टेजवरुन दम भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेत्यांनी याबाबत ट्वीट (एक्स) केले असून धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावरुन तीव्र पडसाद उमटत आहेत.
शरद पवारांचं मिशन नाशिक; १२ नोव्हेंबरला जिल्ह्यात सहा जाहीर सभा, असा असेल दौरा…

घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं…

खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर टीका करताना महायुतीने देखील काय केलं हे सांगत असताना, ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत दिसले. तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो”, अशा शब्दात लाडक्या बहिणींना एकप्रकारे दमच भरला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ”या ठिकाणी काँग्रेसची रॅली निघाली, तर त्या रॅलीमधील महिलांचे फोटो काढा. लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला १५०० रुपये घेतात, त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या. घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं असं अजिबात चालणार नाही. अनेक ताई आहेत ज्या छात्या बडवून सांगत आहेत की, आम्हाला या योजनेचे पैसे नकोत. जर पैसे नको असतील, तर राजकारण का करताय? असा सवालही त्यांनी केला. ज्यांना या योजनेचे पैसे नकोत, त्यांना म्हणायचं या फॉर्मवर सही कर, उद्यापासून लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद”, असंही धनंजय महाडिक यांनी महिलांना म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह विजय वडेट्टीवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

महाडिकांचा कोल्हापूरशी काहीही संबंध नाही

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी या वक्तव्याचा निषेध करताना, ”या राज्यात विरोधकांच्या सुनेला देखील साडीचोळी देऊन पाठवण्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला आहे. या महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे. धनंजय महाडिक यांनी गेल्या वेळेस देखील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा अपमान केला होता. आता पुन्हा एकदा महिलांचा बंदोबस्त करू व्यवस्था करू असे म्हणत अपमान करत आहेत. महाडिक यांची पार्श्वभूमी कोल्हापूरकरांना माहिती आहे. गुंडगिरीची भाषा आणि या भाषेतून दहशत पसरवणे हा एकमेव अजेंडा महाडिक कंपनीचा राहिला आहे. मात्र, कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे असल्या धमकीला कोल्हापूरची माता-भगिनी घाबरणार नाही. ते १५०० रूपये घरातले पैसे दिल्यासारखे बोलत आहेत. १५०० रुपये दिले आहेत आमच्या सोबत या, छाती बडवून घेत म्हणत आहे. आमची सुरक्षा द्या म्हणत आहेत. त्यांना महिलांना कोणतीही सुरक्षा देण्याचं मनामध्ये नाही. मुळात महाडिक हे कोल्हापूरचे नाही, कोल्हापूरशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते पर जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकर, ताराराणी यांचा वारसा ते सांगू शकत नाही. या मातीचा गुण काय आहे त्यांना माहिती नाही. त्यांच्या या वक्तव्याचा मी आणि काँग्रेस जाहीर निषेध करतो” असे सतेज पाटील म्हणाले आहेत.

स्पष्टीकरण देत माता भगिनींची माफी

तर खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसकडून विरोध होऊ लागल्यानंतर स्पष्टीकरण देत माता भगिनींची माफी मागितली आहे. ”माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनींचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना, विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना, लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठाम पणे नमूद करताना चुकून आलेली प्रतिक्रिया आहे. नेहमीप्रमाणे काँग्रेसने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या निवडणुकीत गेमचेंजर आणि अतिशय पॉप्युलर योजना आहे. महाराष्ट्रात दोन करोड तीस लाख महिलांना याचा लाभ झाला आहे. कोल्हापुरात साडेदहा लाख महिलांना लाभ मिळाला आहे. काँग्रेसचे यापूर्वी त्यांच्या सत्ता असलेल्या राज्यात ज्या योजना जाहीर केल्या त्या आता सुरू नाहीत. यामुळे आजच्या भाषणात माझ्याकडून काँग्रेस फेक नरेटिव्ह सेट करण्याच प्रयत्न करत आहे” असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.