Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
BJP leader to join Shiv Sena UBT : पवन पवार व विक्रम नागरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा मनोदय पवार यांनी बोलून दाखवला.
महाविकास आघाडीचे नाशिक पश्चिम मतदारसंघातील उमेदवार सुधाकर बडगुजर व नाशिक मध्य मतदारसंघातील वसंत गिते यांच्या प्रचारार्थ राऊत शनिवारी नाशिक दौऱ्यावर आले असता पवन पवार व विक्रम नागरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा मनोदय पवार यांनी बोलून दाखविला.
नागरे यांनीही प्रवेशाची तयारी दर्शविली. आमची नाराजी दूर होत नसल्यामुळे आम्ही भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे नागरे यांनी सांगितले. दरम्यान, नागरेच्या प्रवेशामुळे बडगुजर यांचे बळ वाढणार असले तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ठाकरे गटाच्या उमेदवारांना त्रासदायक ठरण्याची चर्चा होत आहे.
Poonam Mahajan : दिल्लीतले नेते म्हणाले महाराष्ट्रातून लोकसभेचं तिकीट कापलं, म्हणजे… पूनम महाजन थेटच बोलल्या
वंचितकडून पवन पवार निलंबित
पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पवन पवार यांना वंचित बहुजन आघाडीने तीन वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले असून, पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांतून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. यासंदर्भातील पत्र वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.
Nashik News : ऐन निवडणुकीत भाजपला धक्का, बड्या नेत्याची संजय राऊतांशी भेट, ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधणार
काँग्रेसचे २१ पदाधिकारी निलंबित
मतदानाला दहा दिवस शिल्लक असताना निवडणुकीत बंडखोर म्हणून रिंगणात असलेल्या राज्यातील २१ पदाधिकाऱ्यांना काँग्रेसने पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. याबाबतचे अधिकृत आदेश रविवारी जारी करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यात महायुतीला टक्कर देत आहे. मविआमध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा समावेश आहे. आघाडी असल्याने अनेक मतदारसंघातून उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्यांना उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करण्यात आली आहे.
Mahim Online Poll : सरवणकर म्हणाले तिहेरी लढतीत अमित ठाकरेंना फायदा, ऑनलाईन पोलचा धक्कादायक अंदाज, फक्त १२ टक्के…
काँग्रेसकडून राज्यभरातील काही मतदारसंघांमध्ये बंडखोरी करण्यात आली आहे. यात विदर्भातील आरमोरी, गडचिरोली, बल्लारपूर, भंडारा, अर्जुनी मोरगाव, उमरखेड, यवतमाळ, काटोल आणि रामटेक मतदारसंघाचा समावेश आहे. बंडखोरी उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतरही काही मतदारसंघांत बंडखोर कायम राहिल्याने अखेर काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नितला यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निलंबित केल्याचे आदेश काढले.