Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लेकाला उपचारासाठी नेताना काळ आडवा आला, भरधाव ट्रॅक्टरची बाईकला धडक; आई-वडिलांसह मुलाचा अंत

9

Parbhani Accident News: हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथील एकनाथ बाबाराव घुगे आणि शुभांगी एकनाथ घुगे हे दाम्पत्य परभणी येथील खासगी दवाखान्यात मुलगा समर्थ याला उपचारासाठी घेऊन आले होते.

हायलाइट्स:

  • मुलाला उपचारासाठी घेऊन जाताना कुटुंबावर काळाचा घाला
  • आई वडिसांसह मुलाचाही अपघातात दुर्दैवी मृत्यू
  • परभणीत वसमत रस्त्यावरील सागर चौपाल परिसरातील घटना
Lipi
परभणी आई वडिलांसह मुलाचा मृत्यू

धनाजी चव्हाण ,परभणी : आपल्या मुलाला परभणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आलेल्या आई वडिलांसह मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. परभणी शहरातून वसमतकडे जाणार्‍या महामार्गावर आसोला पाटीजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून तिन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात विनानंबरच्या ट्रॅक्टर चालवत असलेल्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथील एकनाथ बाबाराव घुगे आणि शुभांगी एकनाथ घुगे हे दाम्पत्य परभणी येथील खासगी दवाखान्यात मुलगा समर्थ याला उपचारासाठी घेऊन आले होते. परभणी येथे दवाखान्यात औषधोपचार घेऊन होंडा शाईन दुचाकी क्र. एमएच 38 एसी 8371 वर बसून ते तिघे गावाकडे निघाले होते. वसमत रोडवरील आसोला पाटी येथे एका विना नंबरच्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकाने आपले वाहन भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवून दुचाकीस समोरून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरची धडक बसून खाली पडताच त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयत एकनाथ यांचा भाऊ नवनाथ बाबाराव घुगे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
दुश्मनी जम कर करो लेकिन…, ‘थोरात-विखे’ वादावर बाळासाहेब थोरात यांचा चिमटा, काय म्हणाले?

एका विनानंबरच्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकाने आपले वाहन भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून दुचाकीस धडक देऊन एकनाथ बाबाराव घुगे (वय ३७), शुभांगी एकनाथ घुगे (वय ३४) आणि मुलगा समर्थ एकनाथ घुगे (वय ११ रा. अंजनवाडी ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली) यांच्या मरणास कारणीभूत ठरला म्हणून विनानंबरच्या अज्ञात चालकाविरोधात कलम १०६ (१), २८१ भा.न्या.सं. सहकलम १३४ (अ), (ब) मोटार वाहन कायद्यानुसार ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास स.पोनि गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि शिवकांत नागरगोजे हे करत आहेत.

परभणी-वसमत रोडने प्रवास करणारे प्रवासी आणि शेतकर्‍यांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मरे आणि स.पोनि बंदखडके तसेच ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे, अप्पाराव वराडे, रामकिशन काळे, महामार्ग पोलीस पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक मीना करपुडे, पोलीस उपनिरीक्षक नाटकर, टाकरस,पोना विजय मुरकुटे, अनिल भराडे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच तिन्ही मृतदेह रूग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलिस प्रशासनास मदत करण्यासाठी पोलिस पाटील पंढरीनाथ रिक्षे, बाळासाहेब जावळे, ग्रा.पं.सदस्य अरुण डहाळे आदींनी पुढाकार घेतला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.