Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ऐन निवडणुकीत भाजपला धक्का, ‘या’ नेत्याची संजय राऊतांशी भेट, ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचा थरार, दोन महिलांचा थेट…
Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
२. विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक असताना वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष पवन पवार आणि भाजप कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. दोघेही येत्या १५ नोव्हेंबर रोजी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत हाती शिवबंधन बांधणार आहेत. यामुळे वंचितसह भाजपला धक्का बसला आहे. तर, महाविकास आघाडीचे बळ वाढेल, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे.
३. ‘निवडणुकांमध्ये पदवीधर बेरोजगारांना मासिक भत्ता देण्याचे राजकीय पक्षांचे आश्वासन म्हणजे चांगल्या प्रकारचे उत्पादक रोजगार निर्माण करू शकत नसल्याची कबुलीच आहे. राज्य सरकारच्या रेवड्यांमधून रोजगार क्षमता वाढणार आहे का; तसेच नोकऱ्या निर्माण करण्याची इच्छाशक्ती मारली जाईल का, हे प्रश्न मतदारांनी ठामपणे विचारले पाहिजेत,’ असे परखड मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. अभय टिळक यांनी रविवारी व्यक्त केले.
४. मोदी आणि शहा यांनी शिवसेनेचा घात केला आणि चोर कंपनी घेऊन माझ्यावरच वार करायला येत आहात. हे कदापि शक्य होणार नाही. वार करायला येणार असाल तर माझा शिवसैनिकच तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी सोलापुरातील जाहीर सभेत दिला.
५. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी धडाडली. प्रभादेवीत घेतलेल्या प्रचारसभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंपासून सदा सरवणकर यांच्यापर्यंत अनेकांवर टीकेची झोड उठवली. अमित निवडणुकीला उभा राहत असताना मी भिका नाही मागणार, असं त्यांनी निक्षून सांगितलं, तर जे कोणाचेच झाले नाहीत त्यांच्यावर काय बोलणार, असं म्हणत सदा सरवणकरांनाही टोले लगावले. बातमी वाचा सविस्तर…
६. ‘लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना भविष्यात दीड हजारांऐवजी २१०० रुपये मिळणार असून आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. म्हणूनच तुम्हाला विनंती करतो, येत्या निवडणुकीत धनुष्यबाणाचे बटण असे दाबा, की विरोधकांचे डिपॉझिटच जप्त झाले पाहिजे’, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात प्रचाररॅलीत मतदारांना केले.
७. साऊथ आफ्रिका संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा ३ विकेटने पराभव केला. या विजयासह यजमान आफ्रिकेने मालिकेमध्ये १-१ ने बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने या सामन्यात २० ओव्हरमध्ये १२४-६ धावा केल्या होत्या. त्यामुळे आफ्रिका या लक्ष्याचा सहजपणे पाठलाग करेल असं सर्वांना वाटत होतं. मात्र वरूण चक्रवर्तीने सामन्यात रंगत आणली, पठ्ठ्याने पाच विकेट घेत आफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं होतं. मात्र कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या एक निर्णयाने सामना पलटला आणि अटीतटीच्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला.
८. दिवाळी संपले की लगेचच लग्न सराईचा हंगाम सुरू होतो. सर्वसामान्यांप्रमाणेच बरेच सेलिब्रिटी मंडळी सुद्धा विवाह बंधनात अडकतात. गेल्या वर्षी मराठी फिल्म इंडस्ट्री मधील बऱ्याच कलाकार मंडळींनी लग्न केले होते त्यामध्ये गौतमी देशपांडे स्वानंद तेंडुलकर, मुग्धा वैशंपायन प्रथमेश लघाटे, स्वानंदी टिकेकर आशिष कुलकर्णी, पूजा सावंत यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता. यंदा अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने लगीन सराईला सुरुवात केली आहे.
९. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ३% वाढ करण्याची घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३% झाला असून यामुळे कर्मचाऱ्यांना चांगला फायदा झाला मात्र, यानंतर आणखी एक प्रश्न उपस्थित होत आहे की आता मूळ वेतनात महागाई भत्ता जोडला जाणार का? असं झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत मोठा बदल होऊ शकतो. यापूर्वीही यावर चर्चा झाली असून आता पुन्हा एकदा हाच विषय जोर धरू लागला आहे. महागाई भत्त्याचा (DA) संपूर्ण हिशोब काय आहे आणि त्याचा पगारावर काय परिणाम होऊ शकतो.
१०. आपल्या मुलाला परभणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आलेल्या आई वडिलांसह मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. परभणी शहरातून वसमतकडे जाणार्या महामार्गावर आसोला पाटीजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून तिन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात विनानंबरच्या ट्रॅक्टर चालवत असलेल्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी वाचा सविस्तर…