Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sanjay Raut on Amit Shah: ”बाळासाहेबांवर आपलं इतकं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना आपण गैरमार्गाने फोडली नसती. बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंचशिवाय पुढे सरकत नाही”
हायलाइट्स:
- अमित शहा खोटं बोलत आहे
- व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी
- संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल
बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचं…
”बाळासाहेबांवर आपलं इतकं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना आपण गैरमार्गाने फोडली नसती. बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंचशिवाय पुढे सरकत नाही. तुमच्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोकं अधिक चांगली आहेत. त्यांना बाळासाहेबांविषयी अत्यंत आदर आहे. त्यांचं तुमच्यासारखं ढोंगी प्रेम नाहीय. आम्ही सातत्याने सांगत आहोत की वीर सावरकरांना भारतरत्न द्या, हे का देत नाही? कारण त्यांना भारतरत्न देणं हे अमित शहांच्या हातात आहे. ते ३७० कलम हटवण्यात स्वतःची पाठ थोपटून घेऊ शकतात. मैंने हटाया, मैंने हटाया, मग द्याना त्यांना भारतरत्न तुम्हाला कोणी अडवलं आहे. तुम्ही तुमच्या पोस्टरवरच्या आणि बॅनरवरच्या बाळासाहेबांचे फोटो काढा लोकं तुम्हाला महाराष्ट्रात उभा करणार नाही, असा टोला देखील राऊतांनी महायुतीला लगावला आहे.
महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? निवडणुकीपूर्वी निकालाचं सर्वेक्षण, आवडता CM कोण?
सर्वेक्षण अंदाज चुकणार…
दरम्यान, मैटराइजच्या नुकत्याच आलेल्या सर्वेक्षणावर संजय राऊतांना सवाल केला असता ते म्हणाले की, ”जे कोणाचे सर्वे येत आहेत त्याच्यावरती फार विश्वास ठेवावा अशी काही परिस्थिती नाहीय. लोकसभेला देखील सर्वे आले होते की, महाविकास आघाडीला १० जागा देखील मिळणार नाही. पण आम्ही ३१ जागा जिंकलो. महायुतीचे लोक कुठूनही सर्वे करून घेतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील. मी सांगत आहे की आम्हाला १६० ते १६५ जागा मिळणार आहेत. भाजपची लोक चोऱ्या माऱ्या करून ज्या जागा जिंकतात तिथे आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सावध राहायला सांगितलं आहे. आता जे सरकार आहे चंद्रचूड कृपेने किंवा मोदी शहांच्या कृपेने बसलेले आहे. ते पुन्हा निवडून येणार नाही आहे अशी खात्री आहे”, असा विश्वास देखील राऊतांनी यावेळी दर्शवला.