Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sunil Tatkare In Alibag Murud Constituency Mahendra Dalvi : सुनील तटकरे यांनी अलिबाग मुरुड मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, देशात भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएचे सरकार आहे. तसेच महाराष्ट्रात भाजप प्रणित युतीचे सरकार आहे. सत्ता असली तर विकास हा गतिमान होतो. याचा विचार करून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झालो. सत्ता हे उपभोगण्याचे साधनं नसून ते सेवा करण्याचे आहे.
महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्या योजनेबाबत संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना आत्मीयता वाटते. लाडक्या बहिणींबाबत निर्माण झालेला विश्वास हा आमच्यासाठी महत्वाचा आहे. कारण निवडणुका येतात आणि जातात”, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.
माजी आमदाराच्या भावनिक पत्राने मतदारसंघातील वातावरण टाईट; मतदानाच्या आधी घेणार निर्णय
ज्यावेळी लाडकी बहिण योजना आणली त्यावेळी राज्य सरकार आर्थिक संकटात जाईल. पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे उरणार नाहीत. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी वक्तव्य केले की आमचे सरकार आले तर योजना बंद करू, मात्र आता महाविकास आघाडीने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी नावाची योजना आणून तीन हजार रुपयाचा निधी देऊ असे नमूद केले आहे.
नवीन पैलवान येतील, मात्र वस्ताद एकच…काहीही करा पण पवार साहेबांचा नाद करू नका; रोहित पवारांचं फडणवीसांवर टीकास्त्र
काही बदल करणाऱ्या योजना आम्ही मागच्या ४ महिन्यात केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. लाडकी बहीण योजनेत आम्ही २१०० रुपये करणार आहोत, २ कोटी ३० लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. आम्ही शेतकरी सन्मान योजना १५ हजार रुपये, शेतकरी सन्मान योजना १५ हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत, २० टक्के अधिक अनुदान असेल, राज्यातल्या ग्रामीण भागात रस्ते करणार आहोत, असेही तटकरे यांनी सांगितले आहे.
Raigad News : हा तर महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अवमान; मविआला टोला लगावताना तटकरेंनी केले मोठे वक्तव्य
यावेळी महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी सांगितले, की अकराव्या निवडणुकीला सामोरे जात आहे. ग्रामपंचायतपासून आतापर्यंतची ही अकरावी निवडणूक आहे. माझी लढाई ही विरोधकांशी नसून ती माझ्याशी आहे. राजकीय जीवनामध्ये अनेक कार्यकर्ते आम्ही प्रत्येक निवडणूक लढवली. सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीत ३८ हजारहून अधिक मतांधिक्य अलिबाग विधानसभा मतदारसंघात दिले होते. ही निवडणूक लढत असताना खऱ्या अर्थाने २०१९ ला आपण आमदार केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास मुरुड शहर आणि ग्रामीण भागाचा करत अनेक विकास काम करत अनेक प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. म्हणून शहराला २८७ कोटी रुपयांचा निधी दिला असून ग्रामीण भागात दहा हजार कोटीहून अधिक निधी विकासकामांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
दरम्यान, यावेळी गेल्या अडीच वर्षातील आमदार महेंद्र दळवी यांच्या कामकाजातील कुशलता आणि हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची कार्यपद्धती पाहून राजपुरी, शिघ्रे ग्रामपंचायत, एकदरा या भागातील शेकडो कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थ यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.