Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मिमिक्री अन् टीकेचे बाण, प्रचारादरम्यान पुण्यात पेटले रान; अजित पवार विरुद्ध संग्राम थोपटेंमध्ये शाब्दिक सामना
Sangram Thopte Commented on Ajit Pawar Remarks: आमदार संग्राम थोपटे यांनी देखील प्रचारादरम्यान अजित पवारांचे नाव न घेता टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पवार आधी टीका करतात, नंतर पश्चाताप करतात, असे म्हणत थोपटेंनी अजितदादांना चिमटा काढला आहे.
महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुळशी सभा पार पडली. यादरम्यान अजितदादांनी आमदार संग्राम थोपटेंची मिमिक्री केली आणि आमदाराच्या अंगात पाणी असावे लागते, अशी टीका केली. यासोबतच अजित पवारांनी एसटी स्टँडच्या विकासावरुन देखील संग्राम थोपटेंवर निशाणा साधला. ‘भोरचे एसटी स्टँड आहे की पिकअप शेड? माझ्या बारामतीत येऊन पाहा,’ असे पवार म्हणाले. यावर संग्राम थोपटेंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? निवडणुकीपूर्वी निकालाचं सर्वेक्षण, आवडता CM कोण?
संग्राम थोपटे म्हणाले, ‘जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसतसे भोर तालुक्यात नेत्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत. या नेत्यांनी कायमस्वरूपी भोर तालुक्याचे पाणी पळवल्याचा प्रयत्न केला असून माझ्याबद्दल मुळशीत नेत्यांनी माझ्या अंगात पाणी नाही, अशी टीका टिप्पणी केली. पण त्या नेत्यांना मला आवर्जून सांगायचे आहे की, माझ्या अंगात किती पाणी आहे हे आपणाला लोकसभेच्या निवडणुकीत दाखवले आहे आणि येणाऱ्या विधानसभेलाही भोरची आणि या मतदारसंघातील जनता तुम्हाला चांगल्या पद्धतीचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही,’
यासोबतच ‘आम्ही सुसंस्कृत आहोत. प्रचाराच्या सांगता सभेत अजित पवारांच्या टीकेला समाचार घेतला जाईल, असेही संग्राम थोपटे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांमधील हे आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु असल्याने यामुळे पुण्यातील राजकारण मात्र तापले आहे.
मिमिक्री अन् टीकेचे बाण, प्रचारादरम्यान पुण्यात पेटले रान; अजित पवार विरुद्ध संग्राम थोपटेंमध्ये शाब्दिक सामना
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या प्रचारसभांमधून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यासोबतच मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजनांचा देखील बार उडवण्यात आला आहे. यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे १२ दिवसांत स्पष्ट होणारच आहे. पण हे १२ दिवस राजकीय धुरिणांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत.