Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुख्यमंत्री शिंदेंची सभा रद्द, उमेदवाराचं ब्लडप्रेशर वाढलं, रुग्णालयात दाखल; भाजपवर गंभीर आरोप

4

Nagar Bhausaheb Kamble Blood Pressure Increased: आता भाऊसाहेब कांबळे यांनी भाजपच्या नेत्यांवर नाव न घेता आरोप केले आहेत. ज्यांनी उमेदवारी घेण्यास लावले, त्यांनीच ती मागे घेण्यासाठी दबाव आणला.

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्र्यांची सभा रद्द, उमेदवाराचे वाढले ब्लडप्रेशर
  • भाऊसाहेब कांबळे रुग्णालयात दाखल
  • उमेदवाराचे भाजपवर गंभीर आरोप
महाराष्ट्र टाइम्स
मुख्यमंत्री सभा रद्द भाऊसाहेब कांबळे रक्तदाब वाढला

नगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आजची सभा रद्द झाल्याने श्रीरामपूरमधील शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मतदारसंघात महायुतीकडून माजी आमदार लहू कानडे (राष्ट्रवादी) आणि बंडखोर भाऊसाहेब कांबळे (शिवसेना) उमेदवार आहेत. कांबळे यांच्यासाठी मुख्यमंत्री आज श्रीरामपूरला शिंदे येणार होते. मात्र, ही सभा काल रात्री ऐनवेळी रद्द झाल्याचे सांगण्यात आले.या मतदारसंघात महायुतीकडून दोन उमेदवार देण्यात आले आहेत. कांबळे यांनी माघारीच्या दिवशी मोबाईल बंद ठेवल्याने त्यांचा अर्ज राहिल्याचे सांगत कानडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार लहू कानडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केले होते. सध्या भाजप लहू कानडे यांच्यासोबत आहे. तर कांबळे यांनीही लढाई सुरूच ठेवली. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा नेमका उमेदवार कोण? याचा पेच कायम राहिला होता. मात्र, आता मुख्यमंत्र्यांची सभा रद्द झाली आहे. ती रद्द का करण्यात आली? याचे स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले आहे.
Raj Thackeray: सत्तेत जाण्याचा फॉर्म्युला काय? किंग, किंगमेकरची चर्चा फालतू म्हणत राज ठाकरेंचं त्रोटक उत्तर

आता भाऊसाहेब कांबळे यांनी भाजपच्या नेत्यांवर नाव न घेता आरोप केले आहेत. ज्यांनी उमेदवारी घेण्यास लावले, त्यांनीच ती मागे घेण्यासाठी दबाव आणला. आपल्यावर भाजपच्या नेत्यांकडून दबाव आणला जात आहे, असा आरोप कांबळे यांनी केला आहे. मात्र, जोपर्यंत आपला शिवसेना पक्ष उमेदवारी मागे घेण्यास सांगत नाही, तोपर्यंत आपण रिंगणात कायम राहणार आहोत, असेही कांबळे यांनी म्हटले आहे. त्यांना रात्रीच रुग्णालयात दखल करण्यात आले आहे.

ऐनवेळी सभा रद्द झाल्याने भाऊसाहेब कांबळे यांनी टेन्शन घेतले असून काल रात्रीपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे श्रीरामपूरला लागून असलेल्या नेवासा मतदारसंघातील उमेदवारासाठी थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे. श्रीरामपूर येथील सभा ऐनवेळी रद्द करण्याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विजयसिंह होलम

लेखकाबद्दलविजयसिंह होलमविजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.