Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बॉक्स ऑफिसवर रूह बाबाची कमाल, सिंघम अगेनची जादू पडली फिकी, ११ दिवसांनंतर भुल भुल्लैयाची तब्बल इतकी कमाई
Singham again vs bhool bhulaiyaa 3 collection:”दिवाळी सुट्ट्या बॉलिवूडसाठी खास ठरतात. या काळात प्रदर्शित सिनेमे बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसून येतात.
भुल भुल्लैया ३ सिनेमा प्रदर्शित होऊन आता ११ दिवस झाले आहेत. तरीही सिनेमाची कमाई जोरदार होत आहे. दुसऱ्या वीकेंडलाही सिनेमानं चांगली कमाई केल्याचं दिसून आलं. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार सिनेमानं दुसऱ्या सोमवारी पाच कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या रविवारी सिनेमाची कमाई ही पहिल्या रविवारच्या तुलनेत कमी होती. दुसऱ्या रविवारी सिनेमानं १३ कोटींचा गल्ला जमवला होता. येत्या आठवड्यातही सिनेमाची कमाई समाधानकारक होईल, असं म्हटलं जात आहे.
एकूण कमाई किती?
तर कार्तिकच्या भुल भुल्लैया ३ ने आतापर्यंत २२१ कोटींची कमाई केली आहे. पण ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेण्याच्या चर्चा पूर्ण होणार की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. सिनेमाचं बजेट हे १५० कोटींच्या जवळपास होतं, त्यामुळं सिनेमाचं बजेट वसूल झाल्यानं निर्मात्यांचं टेन्शन कमी झालं आहे.
अशोक शिंदे यांना आहे तेलाचं वावडं,पाण्यातलं ऑमलेट, पाण्यातली बुर्जी, आणि बटाटे वडे तर….
सिंगम पडला मागे
तर सिंघम अगेनबद्दल बोलायचं झालं तर, ११ व्या दिवशी सिनेमानं ४.२५ कोटींची कमाई केली आहे. तर सिंघम अगेनची आतापर्यंतची एकूण कमाई ही २११ कोटींच्या जवळपास असल्याचं म्हटलं जात आहे.
बॉक्स ऑफिसवर रूह बाबाची कमाल, सिंघम अगेनची जादू पडली फिकी, ११ दिवसांनंतर भुल भुल्लैयाची तब्बल इतकी कमाई
देवीने सायलीला दिलेला कौल खरा ठरला, अर्जुनमुळे मधुभाऊंची सुटका! चैतन्यने साक्षीच्या तोंडावर मारले टोमणे
दरम्यान, दोन्ही सिनेमे हे या पूर्वी प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या सिनेमांचे सिक्वेल आहेत. त्यामुळं दोन्ही सिनेमांबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. सिंघम अगेन हा ड्रामा आणि अॅक्शन प्रकारात मोडणारा सिनेमा आहे तर भुल भुल्लैया हा हॉरर कॉमेडी आहे. सिंघम अगेन मध्ये अजय देवगण, अर्जून कपूर, करिना कपूर खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर भुल भुल्लैयात कार्तिकसोबत विद्या बालन, माधुरी दीक्षित यांच्याही भूमिका आहेत.