Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Nov 2024, 10:50 am
Sanjay Raut on CM Eknath Shinde : संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत निवडणूक आयोगाने सर्वाना समान वागणूक द्यावी अशी मागणी केली आहे.ठाकरे गटाच्या नेत्यांच्या बॅगांची तपासणी होत असेल तर राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या ताफ्यातील बॅगांचीही तपासणी व्हायला हवी, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
निवडणूक आयोगाने निष्पक्षपातीपणाने तपासणी करायला काही हरकत नाही. अनेक विधानसभा मतदारसंघात गुजरातचे आमदार आणि मंत्री आलेत. ते काय हात हलवत आलेत का? येताना काय ढोकळा, फाफडा घेऊन आलेत का? कोण कुठे पैशाचं कसं वाटप करत आहे याची माहिती आम्ही वारंवार देत असतो. एकनाथ शिंदे यांच्या लोकांना २५-२५ कोटी पोहोचले आहेत. काही नाक्यांवर सांगोल्यामध्ये पकडण्यात आले, १५ कोटी पकडण्यात आले, कोणाचे सांगितलं का? रेकॉर्डवर फक्त ५ कोटी दाखवले. १० कोटींचा हिशोब कुठे आहे. गाडी कोणाची आणि गाडीत कोण होतं? हे आम्हाला माहिती आहे. उद्धव ठाकरे यांची तपासणी करण्याला आमचा आक्षेप नाही पण सर्वांना समान न्यायाने निवडणूक आयोगाने वागवायला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री असतील, पंतप्रधान आणि अमित शहांच्या ताफ्यातुन बॅग उतरत नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
Pune News : कमावत्या पत्नीला पोटगी मिळणार नाही, कौटुंबिक न्यायालयाचे आदेश
लोकसभेवेळी मी एक व्हिडीओ पोस्ट केला, एका तासासाठी मुख्यमंत्री सभेला आले, त्यावेळी १५ -१६ बॅगा त्यांच्या हेलिकॉप्टरमधून उरतरवल्या. एक तासासाठी माणूस कपडे घेऊन जातो. शिंदे शिर्डीमध्ये गेले तेव्हाही बॅगा उतरल्या. दोन तासासाठी हॉटेलला थांबले तेव्हा इतक्या बॅग उतरल्या. यांच्या तपासण्या कोण करणार आहे, का यंत्रणा विकत घेतली गेलीये की तुम्हालाही खोके पोहोचलेत का? हा माझा साधा प्रश्न आहे. एकनाथ शिंदेंना तुमच्यापेक्षा मी जास्त ओळखत असल्याचं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली.