Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Priyanka Chaturvedi vs Akshay Kumar Fans : रितेश देशमुखने लातूरमध्ये काँग्रेसच्या मंचावरुन भाजपविरोधात केलेल्या भाषणाचं कौतुक केल्यानंतर ऑनलाईन टार्गेट केले जात असल्याचा आरोप चतुर्वेदींनी केला.
Priyanka Chaturvedi : रितेशच्या कौतुकामुळे अक्षयच्या फॅन्सना पोटदुखी, ऑनलाईन टार्गेट; ठाकरेंच्या खासदार चतुर्वेदी बरसल्या
प्रियंका चतुर्वेदींचा आरोप काय?
मला लक्ष्य करण्यासाठी आणि माझा नावाचा वापर करून हॅशटॅग चालवण्यासाठी अक्षय कुमारचे काही चाहते आणि सोशल मीडिया हँडल्सना आर्थिक रसद पुरवण्यात आल्याचा आरोपही चतुर्वेदी यांनी केला.
व्याकरणाच्या चुकांमुळे समजलं
मला लक्ष्य करण्यासाठी आज अक्षय कुमारच्या काही फॅन क्लब आणि सशुल्क ब्लू टिक फिल्म इन्फ्लुएन्सरना हॅशटॅग देण्यात आले असून ट्विटचा मसुदा तयार करण्यात आला आहे. ड्राफ्ट केलेल्या ट्विट बँकमधील व्याकरणाच्या चुकांमुळे ते कुठून येत आहेत, याचा अंदाज लावणे सोपे आहे, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणतात.
ठाकरे विरुद्ध मोदी
ठाकरेंच्या शिलेदार असलेल्या प्रियंका चतुर्वेदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या कट्टर विरोधक आहेत, तर अक्षय कुमार हा मोदी समर्थक म्हणून ओळखला जातो. दरम्यान, चतुर्वेदींच्या दाव्यानंतरही, अक्षय कुमारच्या फॅन क्लबमधून त्यांच्यावर ऑनलाइन हल्लाबोल करणारे कोणतेही ट्विट आणि पोस्ट आढळलेले नाहीत.
Uddhav Thackeray : तुम्ही मध्यप्रदेशचे का? गुजरातचे नाही? बॅग तपासणीवेळी उद्धव ठाकरेंचे टोले; म्हणतात, माझा युरिन पॉटही तपासा
रितेशचं कौतुक करणारा व्हिडिओ
प्रियांकाने ‘एक्स’ सोशल मीडिया अकाऊण्टवरुन अभिनेता रितेश देशमुखचा व्हिडिओ ‘लय भारी’ असं लिहित शेअर केला होता. रितेशने भाऊ आणि काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांच्या लातूर ग्रामीण येथील रॅलीत भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता.
Aaditya Thackeray : शिंदे गटातही बंडाची तयारी? मंत्र्याचा ठाकरेंना फोन; उद्धवजी, तुमची जाहीर माफी मागून ८ तगड्या नेत्यांना परत आणतो
रितेश देशमुख काय म्हणाला?
रितेश भाषणात म्हणाला की, सगळे म्हणतात, धर्म धोक्यात आहे. प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे. धर्माला वाचवा… धर्म बचावो…अहो आमचा धर्म आहे… तो आम्हाला प्रिय आहे… प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. जे लोक तुम्हाला बोलतात की धर्म वाचवा…जो पक्ष तुम्हाला बोलतो धर्म वाचवा… खरं म्हणजे ते देवाला प्रार्थना करतात, की आमचा पक्ष धोक्यात आहे, आम्हाला वाचवा. त्यांना म्हणा धर्माचे आम्ही बघून घेतो, तुम्ही आमच्या कामाचे सांगा. तुम्ही आमच्या पिकाला काय भाव देता हे सांगा, आमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत का ते सांगा, असं रितेश म्हणाला.