Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लातूरमध्ये पुन्हा बॅग तपासणी, ठाकरेंनी स्वतःच व्हिडिओ शूट केला, दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक का?

6

Uddhav Thackeray Latur Tour Bags check : बॅग तपासणी अधिकारी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांच्या दिशेने सरसावताच उद्धव ठाकरेंनी त्यांना ‘नाही नाही नाही दादा.. पहिलं आयकार्ड’ म्हणत थांबवलं आणि त्यांचं नाव विचारलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लातूर : यवतमाळमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्याने उफाळलेला वाद ताजा असतानाच आता लातूरमध्येही याची पुनरावृत्ती घडली आहे. औसा हेलिपॅडवर लँड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बॅगा पुन्हा तपासण्यात आल्या. यावेळी दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी स्वतः व्हिडीओ काढल्या. यावेळी त्यांनी बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांचे आयकार्ड आणि अपॉइंटमेंट लेटरही चेक केले.

व्हिडिओमध्ये काय?

बॅग तपासणी अधिकारी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांच्या दिशेने सरसावताच उद्धव ठाकरेंनी त्यांना ‘नाही नाही नाही दादा.. पहिलं आयकार्ड’ म्हणत थांबवलं आणि त्यांचं नाव विचारलं. सगळ्यांना त्यांची अपॉईंटमेंट लेटर दाखवायला सांगत आपापली पाकिटं दाखवायला सांगितली. तुमच्या खिशात किती पैसे आहेत? असा प्रश्नही विचारला. एक-एक करुन प्रत्येकाची नावं आणि विभाग विचारले. सगळे जण महाराष्ट्रातले आहात का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला.
Aaditya Thackeray : शिंदे गटातही बंडाची तयारी? मंत्र्याचा ठाकरेंना फोन; उद्धवजी, तुमची जाहीर माफी मागून ८ तगड्या नेत्यांना परत आणतो

मीच पहिला गिऱ्हाईक का?

कधीपासून तपासणी करत आहात? कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या? पटापट नावं सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर कर्मचाऱ्यांनी साहेब तुमचीच पहिली सभा आहे, असं उत्तर दिलं. त्यावर ‘माझी पहिलीच? दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक का?’ असंही ठाकरे म्हणाले. मोदींच्या तपासायला कुणाला पाठवलं आहे का? सोलापूर एअरपोर्ट बंद आहे. ओदिशामध्ये ज्यांनी मोदींना तपासलं, त्यांना सस्पेंड केलं होतं.

जो न्याय मला, तोच मोदींनाही हवा

पोलीस दादा या, तुमचा पण फोटो काढतो, काय तपासायचं आहे? बॅग तुमच्याकडे ठेवता का? की पुढील मुक्कामी घेऊन जाता? मला प्रॉब्लेम नाही.. असं मिश्कीलपणे उद्धव ठाकरे बोलताना ऐकू येतं. अरे बघा.. लाजू नका.. सगळ्यांची नावं आलीत, टीव्हीवर छान प्रसिद्धी मिळणार आहे. माझा तुमच्यावर राग नाही, जो न्याय मला, तोच मोदींनाही हवा, कारण तेही प्रचारसभेला आले आहेत. काळजी करु नका, आनंदात रहा, महाराष्ट्रातले आहात ना? महाराष्ट्रासाठी जगायचं आणि महाराष्ट्रासाठी मरायचं, इतर राज्यातील लोकांच्या नोकऱ्या चाकऱ्या करायच्या नाहीत, अशी सूचनाही ठाकरेंनी केली.
Raosaheb Danve : दानवेंनी लाथ मारलेले हमदभाई समोर, म्हणतात मी एवढंच म्हटलं, की दादा तुमचा शर्ट अडकलाय, पण त्यांनी…
“तुमच्या कलेक्टर साहेबांचे नाव काय?” असा प्रश्न सुरुवातीला उद्धव ठाकरे विचारताना एका व्हिडिओमध्ये ऐकू येतात. वर्षा ठाकूर ताई असं कर्मचाऱ्यांनी उत्तर दिल्यावर बरं ठीक आहे, जय महाराष्ट्र असं म्हणून ठाकरे निघाले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.