Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मविआने उद्धव ठाकरेंना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावे, इंडिया आघाडीतील घटक पक्षाची मोठी मागणी
Sanjay Sinh Statement on Maharashtra CM Post: राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांनी मात्र मुख्यमंत्री पदाचा जाहीर केलेला नाही. यातच इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या ‘आप’च्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे.
संजय सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील राजकीय परस्थिती आणि मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, माझं असं वैयक्तिक मत आहे की, जर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नंतर जाहीर केला तर एकमेकांचे आमदार महाविकास आघाडीत फूट पाडू शकतात. हरियाणामध्ये नेमकं तेच झालं, काँग्रेसचे गट एकमेकांना पाडायला निघाले. ज्यामध्ये काँग्रेसचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे माझं म्हणणं आहे नंबरवाल्या खेळामध्ये तुम्ही फसू नका. उद्धव ठाकरेंना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा’
Ajit Pawar: शरद पवारांनी स्वत:च EDकडे जायचं! आयडिया कोणाची? निवडणुकीच्या रणधुमाळीत दादांचा गौप्यस्फोट
संजय सिंह पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात जबरदस्त काम केले आहे. मराठी माणूस, मराठी स्वाभिमान या गोष्टीसुद्धा त्यांच्यासोबत जोडल्या जातात. उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवले तर महाविकास आघाडीचाच फायदा होईल, असे देखील संजय सिंह यांनी नमूद केले.
दरम्यान संजय सिंह यांनी ठाकरेंचे बंधु राज ठाकरेंच्या राजकारणावरुन भाकीत केले आहे. ते म्हणाले, राज ठाकरेंची सध्या महायुतीसोबतच भांडणं सुरु आहेत. त्यांच्या मुलाला हवी असलेली जागाही त्यांना दिली नाही. राज ठाकरे नेहमी वेगवेगळ्या भूमिका घेतात, त्यामुळे मला वाटत नाही राज ठाकरे भाजपचं समर्थन करायला जातील. आणि थोडी काही मतं मनसे फोडू शकते, शिंदे गटही फोडू शकतो. पण यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर केले तर मतांची फोडाफोडी कमी होऊ शकते.
मविआने उद्धव ठाकरेंना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावे, इंडिया आघाडीतील घटक पक्षाची मोठी मागणी
तर संजय सिंह यांनी भाजपवर देखील सडकून टीका केली आहे. ‘भाजप महाराष्ट्रामध्ये जे तोडफोडीच राजकारण झालं ते सगळ्यांनी पाहिले. भाजपने महाराष्ट्रातसोबत सावत्र आईसारखा व्यवहार केला. अनेक योजना, प्रकल्प पंतप्रधान स्वत:च्या राज्यात घेऊन गेले. एका राज्याचे नुकसान करून हे करणे हे उचित नाही. आतापर्यंत आपण बाईकचोर व इतर चोर पाहिले, पण भाजपने तर पक्ष चोरला आणि एवढेच नाही तर अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून आता मात्र त्यांना सोबत घेतलं हे साऱ्यांनाच माहित आहे, असे संजय सिंह म्हणाले.