Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भुजबळांना उपमुख्यमंत्री पद दिले, पण नंतर त्यांचे वेगळेच उद्योग, येवल्यातून शरद पवार बरसले

8

Sharad Pawar attack on Chhagan Bhujbal at Yeola Rally: राष्ट्रवादीचे शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील प्रचारसभांच्या माध्यमातून अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांवर निशाणा साधत आहेत. यातच शरद पवारांच्या जवळचे मानले जाणाऱ्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पवारांची साथ सोडून अजित पवार गटाची वाट धरल्याने पवारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने यंदाची निवडणूक दोन्ही गटांसाठी निर्णायक असणार आहे. यासाठी दोन्ही गटातील नेत्यांनी कंबर कसली आहे. तर प्रचारादरम्यान दोन्ही गटांकडून एकमेकांवर वार-प्रहार केले जात आहेत. राष्ट्रवादीचे शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील प्रचारसभांच्या माध्यमातून अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांवर निशाणा साधत आहेत. यातच शरद पवारांच्या जवळचे मानले जाणाऱ्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पवारांची साथ सोडून अजित पवार गटाची वाट धरल्याने पवारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. तर यंदा शरद पवारांनी आपला शिलेदार येवल्याच्या रिंगणात उतरवला आहे. पवारांचे उमेदवार माणिकराव शिंदेंच्या प्रचारसभेतून छगन भुजबळांवर पवारांनी निशाणा साधला. भुजबळांना मोठी पद दिली, पण ते तर वेगळे उद्योग करत होते, असे पवार म्हणाले.

येवल्यातील मतदारांना साद घालताना पवारांनी छगन भुजबळांबाबतीत केलेले विधान पुन्हा गिरवले आहे. ते म्हणाले, ‘मागे मी येवल्यात आलो असता, मी जाहीरपणे सांगितले होते की आमच्याकडून चूक झाली.’ तर ‘भुजबळांना महाराष्ट्राच्या विधानसभा, विधानपरिषदेत संधी दिली, विरोधी पक्षनेते पद दिले. पण, त्यांनी काही उद्योग केले, त्यांना पद सोडावं लागलं, तुरुंगात गेले, त्यांना भेटायला कोणीच जात नव्हते. माझी मुलगी, आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांना आम्ही पुन्हा संधी दिली आणि तुम्ही त्यांना निवडूनही दिले. तेव्हा मुंबईतील शिवाजी पार्कवर संमेलन घेतले होते, त्याचे अध्यक्षपद भुजबळ यांना दिले.’ असेही पवारांनी अधोरेखित केले.
जगातील एकही व्यक्ती सांगू शकत नाही की शरद पवार…; इतके स्पष्ट अन् थेट अजित पवार कधीच बोलले नाहीत
शरद पवारांनी पुढे पक्षफुटीच्या वेळची स्थितीही सांगितली आहे. ते म्हणाले, आमच्या सहकाऱ्याने पक्ष फोडला, तेव्हा भुजबळ सकाळी आले, जे झालं ते वाईट झालं, समजूत काढायला जाऊ का असं मला विचारलं. पण त्यानंतर भुजबळ साहेब गेले ते परत आलेच नाही, दुसऱ्या दिवशी शपथच घेतली. तसेच ‘एखाद्या माणसानं चुकीचे काम करताना काही मर्यादा असतात, त्या भुजबळ यांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, अशा लोकांना पुन्हा निवडुन द्यायचं नाही हा विचार तुम्ही करायचा आहे. इथे अनेक लोक इथे आले आहेत, ज्यांनी नेतृत्वाला फसवले, असे म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळांच्या होमग्राउंडवर त्यांना लक्ष्य केले.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.