Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलायच्या का? घराणेशाहीवरुन जानकरांनी शरद पवारांनाच घेरले

6

Mahadev Jankar Attack on MVA and Mahayuti: जर तुमच्या नंतर तुमच्या पुतण्यांना तुमच्या नातवांना निवडून द्यायचे असेल, तर मग कार्यकर्त्यांनी का केवळ पिढ्यानपिढ्या तुमच्या सतरंज्याच उचलायच्या का, अशा शब्दांत महादेव जानकरांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

Lipi

धनाजी चव्हाण, परभणी : नुकत्याच बारामती येथे झालेल्या भाषणात शरद पवार म्हणाले की, मी आता राजकारणातून निवृत्त होत आहे. तुम्ही मला तीस वर्षे साथ दिली यानंतर माझ्या नातवाला निवडून द्या. जर तुमच्या नंतर तुमच्या पुतण्यांना तुमच्या नातवांना निवडून द्यायचे असेल, तर मग कार्यकर्त्यांनी का केवळ पिढ्यानपिढ्या तुमच्या सतरंज्याच उचलायच्या का, असा सवाल महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो, की आत्ताची भाजप असो या तीनही पक्षांमध्ये घराणेशाही चालत आहे. त्यामुळे या घराणेशाही चालवणाऱ्या पक्षांना बाजूला सारून राष्ट्रीय समाज पक्षाने दिलेल्या सर्वसामान्य उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे

पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सईद खान हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. खान यांच्या प्रचारार्थ आज मानवत येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली, यावेळी बोलताना महादेव जानकरांनी प्रस्थापितांवर निशाणा साधला आहे.
आजवर चुकीच्या माणसांना निवडून दिलं, तेच तुमच्या जमिनी हडपायला बसलेत; गुहागरमध्ये राज ठाकरेंचं टीकास्त्र
महादेव जानकर म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघात मला पराभव पत्करावा लागला. पण आता या विधानसभा निवडणुकीत परभणीच्या चारही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे आहेत. या उमेदवारांना विजयी करून माझ्या पराभवाचा बदला घ्या. राष्ट्रीय समाज पक्ष आता ना महायुतीसोबत आहे ना महाविकास आघाडी सोबत आहे राज्यातल्या तब्बल १३५ जागांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार उभे आहेत. यातील बहुतांश उमेदवार विजयी होणार असा विश्वास देखील महादेव जानकरांनी व्यक्त केला.

राज्यामध्ये कोणतेही सरकार आले तर ते राष्ट्रीय समाज पक्षाला सोडून येणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता स्थापनेत भूमिका महत्त्वाची असेल असेही जानकर म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जर मी निवडून आलो असतो तर केंद्रात मंत्री झालो असतो, अशी खंत देखील यावेळी महादेव जानकर यांनी व्यक्त केली. भाजप असो की काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो यांच्यामध्ये प्रचंड घराणेशाही चालत आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया काहीही सांगू द्या, आमच्याशिवाय राज्यात सरकार बनणार नाही, असा दावा देखील जानकर यांनी व्यक्त केला आहे.

सईद खान हा सच्चा कार्यकर्ता – जानकर

सईद खान हा सच्चा कार्यकर्ता आहे तो आमदार नसतानाही पाथरी विधानसभा मतदारसंघात त्याने ९०० कोटी रुपयांची विकास कामे खेचून आणली आहेत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरा करून पाथरी विधानसभा मतदारसंघात प्रचंड विकास कामे शहीद खान यांनी आणले आहेत त्याला जर आपण आमदार केलं तर तो पुन्हा पाथरी विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलेल त्यामुळे सईद खान याला प्रचंड मतांनी विजयी करा. सईद खानला विजयी केलं तर मी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.