Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nagar Rekha Jare Murder Case Update: या खटल्यात पत्रकार बाळासाहेब जगन्नाथ बोठे प्रमुख आरोपी आहे. सुपारी देऊन खून करविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एकूण ६८ साक्षिदारांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत.
हायलाइट्स:
- नगरमधील रेखा जरे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट
- प्रमुख साक्षिदार माने कोर्टात म्हणाल्या…
- रेखा जरे यांची मोटार घाटात अडवून खून झाला होता
Uddhav Thackeray: स्वत:च्या विकासासाठी राज्याची तिजोरी रिकामी केली, शिंदेंवर टीका; मुख्यमंत्रिपदाबाबतही ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट
ॲड. सुरेश लगड यांनी या खटल्यासंबंधी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबर २०२० रोजी खून झाला. नगर-पुणे महामार्गावरील घाटात जरे यांची गाडी अडवून त्यांचा चाकूने गळा कापून खून करण्यात आला. तत्कालीन डीवायएसपी अजीत पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. यामध्ये जरे यांचा खून सुपारी देऊन करवून घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ११ आरोपींना अटक करून त्यांच्याविरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ज्ञानेश्वर उर्फ गुड्या शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर घोडके, फिरोज राजु शेख, ऋषीकेश उर्फ टम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे, बाळसाहेब जगन्नाथ बोठे, राजशेखर अजय चकली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल आरीफ, महेश वसंतराव तनपुरे व जनार्दन अंकुला चंद्रय्या यांचा समावेश आहे. या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी ६८ साक्षीदारांचे जबाब नोंदविलेले आहे. यामध्ये आरोपी बोठे याने सुपारी देऊन जरे यांचा खून घडवून आणला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.
या खटल्यात आतापर्यंत २० जणांची साक्ष सरकारपक्षातर्फे नोंदविण्यात आली आहे. यामध्ये खुनाची घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या सिंधुबाई सुखदेव वायकर या रेखा जरे यांची मातोश्री आहेत. त्याच या खटल्यातील फिर्यादी आहेत. त्यांची साक्ष पूर्वीच नोंदविण्यात आली आहे.
या खटल्याची सुनावणी दररोज होत आहे. आरोपीचे जामीन अर्ज यापूर्वीच सत्र न्यायालयाने व उच्च न्यायालयाने फेटाळलेला असल्याने त्यांना जेलमध्ये राहावे लागत आहे. यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजयमाला माने यांची साक्ष आज झाली. त्यावेळी त्यांना व्हीसीद्वारे कामकाजात सहभागी झालेले आरोपी स्क्रीनवर दाखविण्यात आले. माने यांनी त्यांना ओळखले नसल्याचे सांगितले. आता पुढील सुनावणी २२ नोव्हेंबरला होणार आहे.