Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तोतया अधिकाऱ्यांकडून वाहनाची तपासणी, लाखो रुपयांची रोकड लांबवली, पोलीस दलात खळबळ; Video व्हायरल

9

Kolhapur Crime News: पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष लक्ष्मण हारणे (वय ५०, रा. बागल चौक, शाहूपुरी, कोल्हापूर) हे एक व्यापारी असून ते यात्रेत पाळणे लावण्याचा व्यवसाय करतात.

हायलाइट्स:

  • तोतया पोलिसांकडून कोल्हापुरात कारची तपासणी
  • ५ जणांच्या टोळीने २५ लाख ४० हजार रुपयांची रोकड लांबवली
  • कोल्हापूर पोलीस दलात खळबळ
Lipi
कोल्हापूर लाखोंची रक्कम चोरली

नयन यादवाड, कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी पोलिसांची शासकीय यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागली आहे. असं असताना देखील पोलीस व्यस्त असल्याचा फायदा आता काही लुटारू टोळी घेताना पाहायला मिळत आहे. कोल्हापुरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यात प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाकडून तपासणी पथक उभे करण्यात आले आहेत. याचा फायदा एका लुटारू टोळीनं घेत शासनाच्या तपासणी पथकांकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून शासनाच्या तपासणी नाक्याच्या आधीच काही अंतरावरच बोगस पथकाने एका व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार काल मंगळवारी रोजी पहाटे पुणे-बंगळुरू महामार्गाजवळ असलेल्या तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ घडला असून यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. माहिती कळताच पोलिसांची ५ पथके संशयितांचा शोध घेण्यास सुरू केलं आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष लक्ष्मण हारणे (वय ५०, रा. बागल चौक, शाहूपुरी, कोल्हापूर) हे एक व्यापारी असून ते यात्रेत पाळणे लावण्याचा व्यवसाय करतात. ते नेहमीप्रमाणे सोमवारी काम केलेल्या कामाची रक्कम घेऊन मंगळवारी पहाटेच्या ५ ते ५:२० च्या सुमारास कारमधून तावडे हॉटेलच्या दिशेने आले. पहाट असल्याने अजून अंधार होता. याचदरम्यान, २५ ते ३० वयोगटातील अज्ञात पाच जणांच्या टोळीने सुटबुट घालत आणि शासकीय अधिकाऱ्यांची नकली ओळखपत्र गळ्यात अडकवून सर्व्हिस रोडला हारणे यांची कार अडवली. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असल्याचे सांगत कारची तपासणी करणार असल्याचे सांगितले. टोळीने कारची झडती सुरू केली आणि त्यावेळी गाडीत २५ लाख ५० हजार रुपये ठेवलेली बॅग बोगस अधिकाऱ्यांच्या हाती लागली. पैसे घेत आचारसंहिता काळात एवढी रक्कम तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, असं सांगून त्यांनी कारवाईची भीती दाखवली. हारणे यांनी त्यांना हे आपल्या व्यवसायाचे पैसे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या टोळक्याने त्यांना आपल्या कारमध्ये बसवून ते सरनोबतवाडीच्या दिशेने घेऊन गेले. तिथे त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल काढून घेऊन पसार झाले. या सर्व घटनेनंतर आपली फसवणूक झाल्याचे हारणे लक्षात येताच त्यांनी थेट गांधीनगर पोलिस ठाणे गाठले. घडलेली हकीकत सांगितली आणि फिर्याद दाखल केली.

Ajit Pawar : साताऱ्यात पिपाणी ठरली वरदान! आमचे १३ वे वंशज वाचले, त्यामुळे थोडीफार इज्जत वाचली, अजित पवार मोकळेपणे बोलले

बोगस अधिकारी बनत लूट पोलीस दलात खळबळ

जिल्ह्यात दीडशेहून अधिक तपासणी पथके शहरांच्या वेशीवर २४ तास काम करत आहेत. तावडे हॉटेल परिसरात शहराच्या प्रवेशद्वारावरच एक अधिकृत स्थिर तपासणी पथक आहे. मात्र, त्याच्या अलीकडेच महामार्गाच्या पलीकडेच सर्व्हिस रोड लगत तिथून थेट बोगस शासकीय अधिकारी बनत तोतया टोळीने केलेल्या सिनेस्टाईल या लुटीमुळे पोलीस दलात आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखत अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून गांधीनगरचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी तपासाच्या सूचना देत गांधीनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पाच पथके तपासासाठी रवाना झाली असून संशयितांचा शोध घेत आहेत. मात्र, या लूटमारीच्या प्रकारामुळे सध्या व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, एका गाडीची ओळख पटलेली असून पुढील तपास सुरू असून गाडी आणि लूट करणारी टोळीतील संशयित देखील कोल्हापुरातीलच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच एलसीबी आणि गांधीनगर पोलीस ठाण्याची गुन्हे शाखा अन्वेषणची टीम वेगाने तपास करत असून आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून ते ताब्यात घेतले आहेत. पहाटेची वेळ असल्याने गाडीचा कलर आणि नंबर मिळून आला असून पुढील तपास सुरू आहे, असं पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी सांगितलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.