Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Capt Savita Singh Flying Helicopter Politicians to Venue : राज्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी एक महिला पायलट नेत्यांना विविध ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत आहे. लोक महिला पायलटला पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.
नेते मंडळींना हेलिकॉप्टरद्वारे सभा स्थळी पोहोचवणाऱ्या महिला पायलट
कॅप्टन सविता सिंह या हेलिकॉप्टरद्वारे नेते मंडळींना विविध गावात पोहोचवत आहेत. सविता या भारतातील एकमेव महिला हेलिकॉप्टर पायलट आहेत, ज्या निवडणूक प्रचारावेळी हे काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत शेगाव, परळी आणि खामगाव सारख्या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून नेत्यांना सुखरुप पोहोचवलं आहे.
Pune News : इंग्रजी येत नाही, पण अर्थसंकल्प सांभाळतोय… साडेसहा लाख कोटीत कुठे टिंब द्यायचा सांगा; अजितदादांचा टोला
पायलट-इन-कमांड म्हणून उड्डाण करणाऱ्या हवाई दलाच्या माजी हेलिकॉप्टर पायलट कॅप्टन सिंह (५१) यांनी निवडणुकीदरम्याच्या उड्डाणांबाबत बोलताना सांगितलं, की ‘जेव्हा एखाद्या महिला पायलटला समोर असलेली गर्दी, व्हीव्हीआयपी लोकं कॉकपिटमधून बाहेर येताना पाहते, तेव्हा त्यांच्याकडून अतिशय आश्चर्य व्यक्त केलं जातं. इतकंच काय तर अनेकांना महिला पायलटला पाहून धक्का देखील बसतो.
Rahul Gandhi : ते अंबानींच्या लग्नात गेले; पण मी गेलो नाही, कारण… राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
कोण आहेत कॅप्टन सविता सिंह
कॅप्टन सविता सिंह गेल्या १७ वर्षांपासून नागरी विमान वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहेत. आधी त्या पवन हंस उडवत होत्या. आता त्या चार्टर कंपनीच्या ऑपरेटर्ससोबत काम करत आहेत. त्यांना आतापर्यंत ७००० तास उड्डाणाचा अनुभव आहे.
प्रचारावेळी उड्डाणाबाबत त्यांनी सांगितलं, की ‘प्रचारावेळीची उड्डाणं सूर्योदय आणि सूर्यास्त दरम्यान होतात, दिवसातून सुमारे पाच ते सहा लँडिंग होतात. पण यापैकी मोठा भाग म्हणजे उड्डाणांच्या दरम्यान, एअर कंडिशनिंग सुरू करुन उभ्या केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये तास-तास बसून व्हीव्हीआयपींची वाट पाहण्यात घालवला जातो.’
कोण आहेत कॅप्टन सविता? अशीही लाडकी बहीण जिच्यामुळे नेते मंडळी सभास्थळी वेळेत पोहोचतात
त्याशिवाय जर दिवसाचं शेवटचं लँडिंग तात्पुरत्या हेलिपॅडवर असेल, तर पायलटला हे लक्षात ठेवावं लागतं, की सूर्यास्तापूर्वी लँडिंग होण्यासाठी नेते वेळेत हजर असतील, हा एक तात्पुरत्या हेलिपॅडसाठीचा महत्त्वाचा निकष आहे. प्रचाराच्या उड्डाणांवेळी माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये उतरण्यासारखे धोके आहेत, कारण अनेकदा अशा भागात हेलिकॉप्टरवर गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.