Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ही उध्वस्त करणारी टोळी… या टोळीच्या हातात कारभार द्यायचा का? विचार करण्याची वेळ, शरद पवारांचा शिर्डीत एल्गार

8

Sharad Pawar in Shirdi : मूळ प्रश्न बाजूला करुन, इतर प्रश्नांकडे घेऊन जाण्याचं म्हणत शरद पवारांनी महायुतीवर टीकास्त्र सोडलं. तसंच त्यांनी आज महत्त्वाचे मंत्रिपद असलेल्यांना त्यांच्या भागातला रस्ता करता येत नाही असं म्हणत विरोधकांवर टीका केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मोबीन खान, राहाता-अहिल्यानगर : दहशतवाद आणि दडपशाहीला घाबरू नका, तुमच्यात धमक असेल तर निवडणुकीच्या माध्यमातून म्हणणं मांडा, फ्लेक्स पाडायचे, बोर्ड पाडायचे याला काय अर्थ? ही उध्वस्त करणारी टोळी… या टोळीच्या हातात कारभार द्यायचा का, हा विचार करण्याची वेळ आली. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आहे, दडपशाही बदलायची असेल तर साथ द्या, महाराष्ट्राचा घालवलेला नावलौकिक परत मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा, अशी साद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिर्डी मतदारसंघातील मतदारांना घातली आहे. बुधवारी राहता शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पवार बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले, लोकसभेत फटका बसला म्हणून आता नवनवीन योजना ते काढताय. लाडकी बहीण योजना आणली हरकत नाही, मात्र आज गरज खरचं कशाची आहे. आज महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहे. गेल्या सहा महिन्यात ८०० हून अधिक मुली घरातून गायब झाल्या आहेत. त्यांचं अपहरण कोणी केलं माहित नाही, त्या लाडक्या मुली नव्हत्या का? मात्र मूळ प्रश्न सोडायचा आणि इतर प्रश्नांकडे घेऊन जायचं, हा यांचा खरा कार्यक्रम असल्याचे म्हणत महायुतीच्या धोरणांवर टीका केली.
कोण आहेत कॅप्टन सविता? अशीही लाडकी बहीण जिच्यामुळे नेते मंडळी सभास्थळी वेळेत पोहोचतात

हिताचे निर्णय घेण्यासाठी साथ द्या

आम्हाला आपल्या हिताचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही निवडून दिले पाहिजे, निर्णय घ्यायचा अधिकार बाळासाहेबांना दिला पाहिजे. मला नको…मी विधानसभेत उभा नाही. यांच्या हातात तुम्ही सत्ता दिली, तर तुमचे सगळे प्रश्न सोडवण्यात कुठल्याही अडचणी येणार नाही.

पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा

इकडे आल्यावर जुने दिवस आठवतात. इकडे मी शाळेत शिकायला होतो.त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आता वेगळ ऐकायला मिळतं.प्रभावती घोगरे म्हणजे माझीच मुलगी.शंकर नानांची मुलगी म्हणजे माझीच.मी अनेक वेळा त्यांच्या घरी गेलेलो आहे.त्यामुळे माझ्या घरातील माणसाला मत देणार ना? असे म्हणत पवारांनी मतदारांना साद घातली.
Pune News : इंग्रजी येत नाही, पण अर्थसंकल्प सांभाळतोय… साडेसहा लाख कोटीत कुठे टिंब द्यायचा सांगा; अजितदादांचा टोला

राधाकृष्ण विखे पाटलांवर शरद पवारांची टीका

एकेकाळी संपन्न असलेला हा भाग आता दुष्काळी होत चालला आहे. पाणी कमी झालं, त्यामुळे पेरूच क्षेत्र घटलं. पाणी कमी पडल्याने साखर कारखाने देखील कमी होऊ लागले. अनेक वर्ष मंत्री असताना तुम्ही इकडे पाणी देऊ शकला नाही, यातून एकच स्पष्ट होतंय, की सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यात नेतृत्व कमी पडत आहे. प्रवास करताना ओळखीचा भाग असला, की हेलिकॉप्टर खाली घेऊन बघत बघत जात असतो आणि परिसराची पाहणी करायची मला सवय आहे. आज या मतदारसंघात देशासह देशाबाहेरील लोक दर्शनाला येतात, मात्र इथे आजही पाण्याची कमतरता आहे.
Rahul Gandhi : ते अंबानींच्या लग्नात गेले; पण मी गेलो नाही, कारण… राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

महत्त्वाचे मंत्रिपद असताना त्यांच्या भागातला रस्ता देखील करता येत नाही

हिंजवडी भागात देखील अशीच परिस्थिती होती, मात्र तेथील युवकांना आणि उद्योजकांना बरोबर घेऊन त्याचा कायापालट मी केला. मग शिर्डीत देखील शेती महामंडळाची हजारो एकर जमीन आहे. शिर्डी संस्थानच्या मदतीने उद्योग आणणं शक्य होतं, मात्र कोणी खोडा घातला मलाच कळल नाही. मात्र काही लोकांना वाटतं आमच्या कॉलेजच काय होईल. आमच लोणीत कॉलेज, नगरला कॉलेज, पुण्यात कॉलेज, मग शिर्डीत जर कॉलेज उभे केले तर आमच्या जवळ कोण येणार? ही त्यांची स्थिती. विरोधी पक्षाचे नेते होते, मात्र सत्तेसाठी त्यांनी पक्ष बदलला म्हणून त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा चुकीची आहे. निळवंडे धरणाच पूर्ण काम बाळासाहेब थोरात यांच्यामुळे झालं. ज्यांच्याकडे आज महत्त्वाचे मंत्रिपद त्यांना त्यांच्या भागातला रस्ता देखील करता येत नाही, असे म्हणत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली.

Sharad Pawar : ही उध्वस्त करणारी टोळी… या टोळीच्या हातात कारभार द्यायचा का? विचार करण्याची वेळ, शरद पवारांचा शिर्डीत एल्गार

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यातही पैसे खायचे

सिंधुदुर्गात नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, कारण सांगितलं वारा जास्त आला. मात्र आम्ही समुद्राजवळ बसवलेल्या पुतळ्याला इतक्या वर्षात काही झालं नाही. मग हाच पुतळा कसा पडतो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे खायचे. हे सगळं बदलायचं असेल तर विधानसभेत परिवर्तन करायचा निर्णय घ्या, असे पवार यांनी म्हटले आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.