Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भाजपने सत्तेसाठी लोकांमध्ये फूट पाडली; मल्लिकार्जुन खरगे संतापले, राज्याला वाचवण्यासाठी मविआला मतदान करण्याची साद
Mallikarjun Kharge On Mahayuti : मल्लिकार्जुन खरगे यांनी पुण्यात कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सभेत बोलताना पंतप्रधान मोदींसह महायुतीवर टीका केला. त्यांनी राज्यातील नोकऱ्या, महिला सुरक्षा तसंच शेतकरी मुद्दावरुन महायुतीला घेरलं.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दत्ता बहिरट, पर्वती मतदारसंघातील उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ वानवडी येथील संविधान चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.
एखादा दहशतवादीच असं बोलू शकतो… ‘बटेंगे तो कटेंगे’ विधानावरुन मल्लिकार्जुन खरगे संतापले, आतंकवादीशी थेट तुलना
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यावेळी उपस्थित होते. भाजपने सत्तेसाठी लोकांमध्ये फूट पाडली. दोन पक्ष फोडले, अशी टीका करून हम लोग जोडने वाले हैं, तोडने वाले नहीं असं म्हणत खरगे यांनी महायुतीवर टीका केली.
बाबा सिद्दीकींवर गोळी झाडली, नंतर लीलावतीबाहेर ३० मिनिटं उभा होता शूटर, कारण काय? पोलिसांनी म्हणाला…
खरगे म्हणाले, मोदींनी महाराष्ट्राच्या विकासावर बोलावे. गांधी परिवाराने आपले प्राण गमावले त्या देशाचा मोदी-शाह या जोडीने सत्यनाश केला आहे. काँग्रेसने विकसित केलेले सगळे हे विकायला निघाले आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पळवले आहेत. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची घोषणा करणारे गप्प आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. महागाई वाढली आहे. सीमेवर घुसखोरी सुरू आहे. राम मंदिर आणि संसद भवन गळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. खोके सरकार केवळ खिसे भरण्यात व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली. तसंच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेद्वारे देशाला जोडण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडी नागरिकांसाठी विविध योजना राबवणार असल्याचं खरगे यांनी सांगितलं.
CNG सारखा टँकर, पण आत होतं भलतंच; पोलिसांच्या तपासात सर्वांनाच धक्का, न्यू ईयरसाठी आखलेली मोठी योजना
पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीआधी भाजपच्या नेत्यांनी चारसो पारची घोषणा दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्य घटना बदलण्याचा त्यांचा डाव लपून राहिला नव्हता. मतदारांनी त्या निवडणुकीत भाजपला धडा शिकवला. मात्र, राज्य घटनेसमोरील धोका टळलेला नाही. भाजपने राज्यात दोन पक्ष फोडले. महायुतीचे सरकार लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत आहे. पण, या राज्यात मुली, महिला असुरक्षित आहेत, राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. हे राज्य वाचवायचे असेल तर महायुतीला सत्तेतून खाली खेचावे लागेल. महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा आल्यास या राज्यातील परिस्थिती दुरुस्त करता येईल. राज्य घटना, लोकशाही आणि महिला सुरक्षा यासाठी नागरिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, अशी सादही त्यांनी घातली.
भाजपने सत्तेसाठी लोकांमध्ये फूट पाडली; मल्लिकार्जुन खरगे संतापले, राज्याला वाचवण्यासाठी मविआला मतदान करण्याची साद
यावेळी रमेश बागवे, रवींद्र धंगेकर, अश्विनी कदम यांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांची भाषणे झाली. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेमुळे संपूर्ण परिसर महाविकास आघाडीमय झाला होता.