Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Election 2024: राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने उद्योगपती गौतम अदानींचा वापर केल्याची टीका लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केली.
नांदेड लोकसभा व विधानसभा निवडणूकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील नवा मोंढा मैदानावर खासदार राहुल गांधी यांची गुरूवारी सायंकाळी पावणे पाच वाजता जाहीर सभा पार पडली. यावेळी तेलंगनाचे मंत्री शब्बीर अली, सचिन पायलट, पक्ष निरीक्षक जहिराबादचे खासदार सुरेश शेटकार, काँग्रेसच्या सचिव जरीता, रजनी पाटील, सूर्यकांता पाटील, डॉ. माधवराव किन्हाळकर, जिल्हाध्यक्ष बि. आर. कदम, नायगाव विधानसभा उमेदवार डॉ मिनल खतगावकर, नांदेड उत्तरचे अब्दुल सत्तार आदींची उपस्थिती होती.
मूर्खासारखे काहीही बोलत असेल तर त्याची नोंद का घ्या; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सरकार पाडण्यासाठी भाजपकडून राजकीय बैठकी घेण्यात आल्या. या बैठकीला उद्योजक गौतम अडाणी यांना बसवण्यात आले होते. . अडाणी यांना धारावीतील जागा पाहिजे होती, त्यांना एक लाख करोड रूपयांचा फायदा करून दिला. त्यांच्यासाठीच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. महाराष्ट्रातील सरकार हे मोदी चालवतात. वेदांता प्रकल्प सरकारने गुजरातला दिला. अनेक उद्योग गुजरातला गेले. दहा हजार युवकांना त्यातून रोजगार भेटला असता. नोटाबंदी, जीएसटी लागू केली. व्यापारी, शेतकरी देशोधडीला लागला असं राहुल गांधी म्हणाले.
मोदींनी उभ्या आयुष्यात संविधान वाचले नाही
कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधानाची लाल डायरी दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. हे संविधान बुध्द, गांधींजी, आंबेडकरांचे विचार आहे. त्याला कोरं म्हणणे म्हणजे या सर्वांचा अपमान आहे. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. आरएसएस आणि भाजपला संविधान मान्य नाही. त्यांचे लपून आंबेडकरांचे संविधान नष्ट करण्याचे लक्ष आहे. तर, संविधान वाचविण्यासाठी आमची लढाई सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी आयुष्यात कधीच संविधान वाचले नसून ते सर्वात श्रीमंत २५ लोकांचे १६ लाख करोडचे कर्ज माफ केले. परंतू, शेतक-यांची कर्जमाफी केली नाही, असा घणाघात काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी नांदेडच्या जाहीर सभेत केला. आरएसएसवर देखील सडकून टीका केली.थेट बारामतीतून हसन मुश्रीफांना इशारा, कागलमधून तुम्हाला पाडायचे आहे; शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांचा एल्गार
महिलांना मोफत प्रवास, शेतकऱ्यांची कर्ज माफी
आमचे सरकार आल्यानंतर महिलांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रूपये त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करणार, त्यांना महाराष्ट्रभर बस प्रवास मोफत, शेतक-यांचे ३ लाख पर्यंतचे कर्ज माफ होणार, शेतमालाला हमी भाव, १६ लाख तरूणांना नोक-या देणार, रोजगार मिळेपर्यंत तरूणांच्या खात्यावर दर महिन्याला चार हजार रूपये, तसेच लोकसभा, राज्यसभेमध्ये जनगनना करण्यास भाग पाडणार, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आम्ही करून दाखवणार, असे खासदार राहूल गांधी म्हणाले.
काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थाकरिता बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या धजीया उडवल्या; नितीन गडकरींचं टीकास्त्र
राहुल गांधी यांची मीडियावर नाराजी
राहुल गांधी यांनी सभे दरम्यान माध्यमांवरही टीका केली. मीडीया मोदींचे मित्र आहेत. आमचे नाहीत तरी, त्यांना मित्र म्हणावे लागते. त्यांची मी काय बोललो यावरच सायंकाळाच्या बैठकीत चर्चा होते. ठरावीक समाजातील लोकच याठिकाणी असतात. तसेच या मीडीयामध्ये मागसवर्गीय, आदीवासी, दलित समाजातील तरूणांचा समावेश आहे का? अशी विचारना करत इतर कॉर्परेटमध्येही हा समाज नसल्याची यादी आपल्याकडे आहे, असेही राहूल गांधी यांनी सांगितले.
बसस्थानकावर प्रवाशांशी साधला संवाद
दरम्यान सभा अटोपल्यानंतर खासदार राहूल गांधी यांचा ताफा अचानक नांदेड येथील मध्यवर्ती बसस्थानकात वळाला. त्यांनी बसस्थानकातील एका हॉटेलवर ऊसाच्या रसाचा अस्वाद घेतला. यावेळी त्यांनी स्वतःच्या खिशातून विक्रेत्याला दहा जणांचे २०० रूपये दिले. तसेच काही महिला प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी राहूल गांधी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती. दरम्यान,काही काळ बससेवा ठप्प झाली होती. तसेच यासंबंधी पोलीस प्रशासनास माहिती नसल्याने त्यांची एकाच धावपळ उडाली.