Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Election Survey: राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना लोकपोलचा सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महायुतीला राज्यात ११५ ते १२८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला १५१ ते १६२ जागा मिळू शकतात.
लोकसभा निवडणुकीत मविआनं ४३.७१ टक्के मतदान घेत ३० जागांवर बाजी मारली होती. तर महायुतीनं ४३.५५ टक्के मतांसह १७ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे मतांची टक्केवारी पाहता काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. पण विधानसभेला मतांच्या टक्केवारीत मविआ बरीच पुढे जाण्याची शक्यता आहे. महायुतीला ३७ ते ४० टक्के, तर मविआला ४३ ते ४६ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Election Survey: महायुतीला धक्का, विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; सर्व्हेतून आकडे समोर
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका बसला. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात अपयश आल्यानं मराठा समाजाची मतं मविआकडे वळली. आता विधानसभेलाही मराठा मतदार महाविकास आघाडीला साथ देईल, असं लोकपोलचा सर्व्हे सांगतो. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला ओबीसी समाज महायुतीच्या अधिक जवळ जाईल. पण त्यांचं एकगठ्ठा मतदान महायुतीला होणार नाही. तर अनुसूचित जाती मविआच्या पाठिशी उभ्या राहतील, असं सर्व्हे सांगतो.
Radhakrishna Vikhe Patil: राहुल गांधींचा ‘तो’ सल्ला न् मी भाजपमध्ये गेलो; शरद पवारांचं नाव घेत विखेंचा मोठा गौप्यस्फोट
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक रहेंगे सेफ रहेंगे अशी घोषणा दिली. मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपच्या विरोधात जाईल, असं लोकपोलचा सर्व्हे सांगतो. शेती, रोजगार, महिला सुरक्षा, महागाई या विषयांचा विचार करुन नागरिक मतदान करतील, असा सर्व्हेचा अंदाज आहे.
Maharashtra Election Survey: बटेंगे तो कटेंगे महायुतीला जड जाणार; मराठा, दलित, ओबीसींचं मतदान कोणाला? काय सांगतो सर्व्हे?
राज्यात भाजपविरोधात वातावरण आहे. मतदार अनेक समस्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार मानतात. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीमधील सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत, अशी माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. महाराष्ट्र विरुद्ध गुजरात हा विषय मतदारांना भावनिकदृष्ट्या जवळचा वाटतो, असं निरिक्षण नोंदवण्यात आलेलं आहे.