Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाणे, कल्याणची जागा जिंकत शिंदेंनी जिल्ह्यातलं त्यांचं वर्चस्व दाखवून दिलं. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे. तिथे केवळ एकच आमदार शिंदेसेनेचा आहे. अंबरनाथ मतदारसंघातून सलग तीनवेळा बालाजी किणीकर यांनी बाजी मारली आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.
काल सोमय्या भेटीला, आज थेट ईडीचं पथक चौकशीला; वोट जिहाद प्रकरणात झाडाझडती, धाड पडताच खळबळ
मागील विधानसभा निवडणुकीत बालाजी किणीकर सहज निवडून आले आहेत. त्यावेळी त्यांच्यासमोर फारसं आव्हान नव्हतं. पण यंदा वातावरण संघर्षपूर्ण आहे. किणीकर आणि शहरप्रमुख यांच्यातील वाद मतदारसंघाला परिचित आहे. किणीकरांचं नाव पक्षाच्या पहिल्या उमेदवार यादीत नव्हतं. त्यामुळे किणीकरांची धाकधूक वाढली होती. अखेर पक्षानं त्यांना तिकीट दिलं. अंबरनाथ सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. १९९५ पासून इथं शिवसेनेचाच उमेदवार विजय होत आला आहे. केवळ २००४ ची निवडणूक याला अपवाद राहिली आहे.
अंबरनाथ शिवसेनेचे माजी प्रमुख अरविंद वाळेकर आणि बालाजी किणीकर यांचे संबंध ताणलेले राहिले आहेत. त्यांच्यातील कटुता मिटवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना बैठक घ्यायला लागली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर किणीकर यांच्यासाठी लढत सोपी नाही. त्यामुळेच त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची यंत्रणा कामाला लावली आहे. किणीकर यांचा पराभव झाल्यास ती शिंदेंसाठी नामुष्की ठरु शकते.
नाशकात राडा! मविआ, महायुतीचे कार्यकर्ते भिडले, वाहनं फोडली; सुप्रिया सुळे पोलीस ठाण्यात दाखल
२०१९ मध्ये जवळपास ३० हजार मतांनी निवडून आलेले किणीकर २०१४ मध्ये अतिशय कमी फरकानं विजयी झाले होते. त्यावेळी युती तुटली असल्यानं भाजपनंही अंबरनाथमध्ये उमेदवार दिला. राजेश वानखेडेंनी जवळपास ४५ हजार मतं घेतली. त्यांनी किणीकर यांना अक्षरश: घाम फोडला होता. किणीकर अवघ्या २ हजार मतांनी विजयी झाले होते. आता तेच वानखेडे ठाकरेसेनेकडून रिंगणात आहेत. त्या निवडणुकीतील त्रुटी दूर करत वानखेडेंनी किणीकर यांच्यासमोर यंदा कडवं आव्हान उभं केलं आहे.