Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Chhatrapati Sambhajinagar 19 Crore Gold-Silver Seized: संभाजीनगर-जळगाव रोडवरील निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना यात १९ कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने सापडले.
हायलाइट्स:
- छत्रपती संभाजीनगरमध्ये घबाड सापडलं
- तब्बल ‘इतक्या’ कोटींचं सोनं-चांदी जप्त
- नेमकं काय घडलं?
Raj Thackeray : गळ्यातलं वजन काढ सांगायचो! रमेश वांजळेंचा शेवटचा कॉल मला; २० मिनिटात मृत्यूची बातमी, राज ठाकरेंनी सांगितली हळवी आठवण
नेमकं काय घडलं?
संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका सराफा दुकानदाराचे जवळपास १९ कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने पकडले. स्थिर पथकाकडून ही कारवाई काल गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. हे दागिने जळगाव येथील एका नामांकित ज्वेलर्सचे असल्याची माहिती समोर आली आहे. स्थिर पथकाने जप्त केलेलं सोनं-चांदी जीएसटी विभागाकडे दिलं आहे. दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलवण्यात आलं आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाणार आहे.
नवी मुंबईत खळबळ
दरम्यान, नवी मुंबईतील नेरुळ येथे देखील दोन दिवसांपूर्वी मोठं घबाड सापडलेलं होतं. राज्यात निवडणुकीचा हंगाम सुरू असून सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाने कुठेही गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होताच पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयित वाहनांची कठोरपणे तपासणी करण्यात येत असून अनेक ठिकाणांहून रोकड, मौल्यवान धातू, वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अशातच ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतील नेरुळ पोलीस ठाण्याला नेरुळ सेक्टर १६ येथील एका रो-हाऊसमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरात रोकड असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरील रो-हाऊसवर छापा टाकण्यात आला असता एकूण २ कोटी ६० लाखांची रोकड सापडली. सुमारे अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून सदर कारवाई ही निवडणूक आयोगाने आणि ठाणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई केली असून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली आहे.