Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उत्तर महाराष्ट्रात जनतेचा कौल कुणाला? मटाच्या ऑनलाईन पोलचा अंदाज, युजर्स म्हणतात आता फक्त…

4

North Maharashtra Vidhan Sabha Opinion Poll: उत्तर महाराष्ट्रात एकूण नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यात एकूण ४७ विधानसभा मतदारसंघ आहेत. उत्तर महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

हायलाइट्स:

  • उत्तर महाराष्ट्रात जनतेचा कौल कुणाला?
  • मटाच्या ऑनलाईन पोलचा अंदाज
  • युजर्स म्हणतात आता फक्त…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
उत्तर महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ ऑनलाईन पोल

जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगत आहेत. तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या आखाड्यात आहे. तर राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीदेखील निवडणुकीला सामोरे जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ने एक ऑनलाईन पोल जारी केला आहे. यात उत्तर महाराष्ट्रात महायुतीला यश मिळणार की महाविकास आघाडीचं वर्चस्व राहणार? ते या पोलमधून अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यात एकूण ४७ विधानसभा मतदारसंघ आहेत. उत्तर महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी लागणार आहे. या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रत्येक मतदारसंघामध्ये चुरशीची लढाई होणार आहे. प्रत्येक उमेदवाराने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ‘मटा ऑनलाईन’च्या पोलच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं वर्चस्व असण्याची शक्यता आहे. २३ टक्के लोकांनी महायुतीला पसंती दर्शवली आहे. तर ७४ टक्के लोकांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात मत टाकलं आहे. तसेच ३ टक्के लोकांनी इतर पक्षांना पसंती दाखवली आहे.
Devendra Fadnavis : भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, ही कार्यकर्त्यांची भावना; पण आता हे सर्व माझ्यासाठी गौण : देवेंद्र फडणवीस

नंदुरबारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता तथा माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपला रामराम केला. अक्कलकुवा मतदारसंघात बंडखोरी करत गावित यांनी अपक्ष उमेदवाराचा अर्ज भरला होता. त्यादरम्यान, हीना गावित यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे. अक्कलकुवा विधानसभेसाठी शिंदे शिवसेनाकडून विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण गावित यांनी या मतदारसंघात आपली भूमिका मांडत पक्षाला राजीनामा दिलेला आहे. याचे पडसाद उत्तर महाराष्ट्रात दिसू शकतात.

Mata Online Poll

विशेष म्हणजे ऑनलाईन मतदार असल्यामुळे यात मतदारसंघाबाहेरील युजर्सनीही आपली मतं नोंदवली आहेत. त्यामुळे हे आकडे प्रत्यक्ष मतदानाचे निदर्शक नाहीत. ही आकडेवारी फसवीही असू शकते. पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या मतदानादिवशी महाराष्ट्रातील मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोणाच्या बाजूने जनता कौल देणार, हे २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.