Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दादा आम्हाला पाडतील; बारामतीत भाजप कार्यकर्त्यांची प्रचाराकडे पाठ, अजित पवारांना डोकेदुखी

4

Baramati Vidhan Sabha : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘दादा’ त्यांच्या समर्थकांना विजयी करण्यासाठी आम्हाला पाडतील; मग आम्ही का त्यांचा प्रचार करायचा,’ असा तक्रारीचा सूर कार्यकर्त्यांनी लावला आहे.

महाराष्ट्र टाइम्स

बारामती : विधानसभा निवडणुकीचा प्रचार तापला असून, महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात प्रचारात दिसत नसल्याची चर्चा आहे. बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी तटस्थपणे भूमिका घेऊन अप्रत्यक्षरीत्या अजितदादांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘दादा’ त्यांच्या समर्थकांना विजयी करण्यासाठी आम्हाला पाडतील; मग आम्ही का त्यांचा प्रचार करायचा,’ असा तक्रारीचा सूर कार्यकर्त्यांनी लावला आहे.

बारामती मतदारसंघात सध्या काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. अजित पवार यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीच्या या लढतीकडे ‘हाय व्होल्टेज’ लढत म्हणून पाहिले जात आहे. दादांसाठी पत्नी खासदार सुनेत्रा पवार, चिरंजीव पार्थ आणि जय पवार हेही मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहेत.
Raj Thackeray : गळ्यातलं वजन काढ सांगायचो! रमेश वांजळेंचा शेवटचा कॉल मला; २० मिनिटात मृत्यूची बातमी, राज ठाकरेंनी सांगितली हळवी आठवण
कार्यकर्ते, मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्यापर्यंत ‘दादाचा वादा’ पोहोचवला जात आहे. युगेंद्र पवार यांच्यामुळे अजित पवारांचे मताधिक्य किती घटेल, याची मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह राजकीय पंडितांमध्ये चर्चा सुरू आहे.

Ajit Pawar : समर्थकांसाठी दादा नंतर आम्हालाच पाडतील; बारामतीत भाजप कार्यकर्त्यांची प्रचाराकडे पाठ, अजित पवारांना डोकेदुखी

दादा, फडणवीस लक्ष कधी देणार ?

‘दादांना सत्तेत घेतले. उपमुख्यमंत्री केले. चंद्रकांत पाटील यांच्याकडून पालकमंत्रिपद काढून त्यांना दिले, मग आमच्या हातात काय आले? जिल्हा नियोजन समितीतून दादांनी कार्यकत्यांनी १०० कोटींची कामे दिली. तर भाजपच्या कार्यकत्यांची एक कोटींची कामे देऊन बोळवण केली, असा आरोपही भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी करीत आहेत. लोकसभेवेळीही आम्ही नाराज होतो. तरीही पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काम केले. पण बारामतीसह जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी, समस्या आणि मागण्यांकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मग त्यांचे आदेशही का मानायचे, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला.
Devendra Fadnavis : भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, ही कार्यकर्त्यांची भावना; पण आता हे सर्व माझ्यासाठी गौण : देवेंद्र फडणवीस

‘विधान परिषदेवर संधी हवी’

‘बारामतीत भाजपचे प्राबल्य वाढवायचे असेल, तर आम्हाला मतदारसंघात विधान परिषद द्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ३० टक्के जागा द्या,’ अशी मागणी कार्यकत्यांनी भाजपच्या श्रेष्ठींकडे केली आहे. मागणी पूर्ण करा; अन्यथा आम्ही महायुतीचा धर्म पाळणार नाही आणि मतदानही करणार नाही, अशी भूमिका भाजपच्या कार्यकत्यांनी घेतली आहे. त्यामुळे दादांना मित्रपक्षांकडून अडचणीत टाकण्याचा डाव आखला जात आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.