Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Vastu Shastra : ओट्यावर पोळ्या लाटणे योग्य आहे का? वास्तूशास्त्र काय सांगते? जाणून घ्या

5

Roti Chapati Roll Out On Kitchen Slab: घराघरात पोळी, भाकरी तयार होते. सहसा पोळ्यांसाठी पोळपाट लाटणे वापरले जाते पण अनेक घरात स्वयंपाकाच्या ओट्यावरच पोळ्या लाटतात. वास्तूशास्त्रानुसार पोळ्यांसाठी कोणती पद्धत चांगली? यासंदर्भात जाणून घेवूया या लेखात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Vastu Shastra : ओट्यावर पोळ्या लाटणे योग्य आहे का? वास्तूशास्त्र काय सांगते? जाणून घ्या

Kitchen Vastu Tips For Polpat-Latane: वास्तुशास्त्र आपल्याला वास्तू संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी सांगतं आणि प्रामुख्याने त्या वास्तूमुळे आपल्याला लाभ कसा होईल याची माहिती देतं. घर, घरातील खोल्या, त्यांची दिशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी किंवा आपली सवय या योग्य की अयोग्य हे सुद्धा वास्तूशास्त्राद्वारे ठरवता येतं. आता पोळ्या काहीजण ओट्यावर लाटतात ते योग्य की अयोग्य तसेच पोळपाट लाटणे आपले भाग्य बदलू शकते, कसे ते जाणून घेवूया.

पोळपाट -लाटणे स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची वस्तू !

वास्तु शास्त्रानुसार, स्वयंपाकघरात वापरले जाणारे पोळपाट -लाटणे हे सुख-समृद्धी देते. पोळपाट -लाटणे यांचा संदर्भ राहु-केतू ग्रहांशी जोडलेला असल्यामुळे ग्रहांचा प्रभाव घरावर पडतो. पोळपाट लाटणे खरेदी करण्यापासून ते वापरण्यापर्यंत काही नियम वास्तूशास्त्रात सांगितलेले आहेत.

स्वयंपाकाच्या ओट्यावर पोळ्या लाटणे योग्य आहे का?

खरंतर पोळ्या तयार करताना पोळपाट लाटण्याचाच वापर करणे योग्य आहे, वास्तू शास्त्रानुसार घराच्या प्रगतीसाठी ते महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार जर घरातील ओट्यावर पोळ्या लाटल्या तर घरातील सुख-समृद्धीमध्ये अडचणी येऊ शकतात. वास्तुदोष किंवा धनसंपत्तीची कमी होवू शकते. माता अन्नपूर्णा नाराज होवू शकते. राहु-केतू ग्रहांचा वाईट प्रभाव घराच्या आनंदावर आणि यशावर होण्याची शक्यता असते. तसे पाहिले तर पोळपाट लाटण्यावर पोळ्या लाटणे योग्यच आहे कारण शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिलं तर स्वयंपाकाचा ओटा जिथे वेगवेगळी भांडी ठेवली जातात, भाजी चिरली जाते. ओटा आपण स्वच्छ करतो पण वारंवार साबणाने घासून त्याला स्वच्छ करणे शक्य नसते. तर पोळपाट लाटणे स्वच्छ घासून धुता येते. तुमच्याकडे भरपूर जागा असेल तर धुतल्यानंतर पोळपाट लाटणे उन्हात वाळवता येतो, त्यामुळे पोळपाट लाटणे याचा वापर करणे सहसा योग्य आहे.

वास्तूशास्त्रानुसार पोळपाट लाटण्यासंदर्भात खालील गोष्टी लक्षात ठेवा.

पोळ्या करताना पोळपाटाचा आवाज होत असेल तर तो बदलून टाका, कारण पोळपाटाचा आवाज वास्तूदोष निर्माण करू शकतो. समजा तुम्हाला पोळपाट बदलायचा नसेल तर पोळपाटाच्या खाली एखादा कपडा किंवा पेपर ठेवावा. पोळपाट लाटण्याचा वापर झाल्यानंतर तो स्वच्छ धुवून ठेवा. आरोग्याच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे आहे. कारण अन्नकण पोळपाटावर राहिले आणि रात्रभर तो तसाच राहिला तर जंतूंचा प्रार्दुभाव होवू शकतो. तसेच धनसंपत्तीवर देखील परिणाम होतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी पोळपाट लाटणे स्वच्छ धुवून ठेवा.

पोळपाट खरेदी करावे

वास्तूशास्त्रानुसार पोळपाट लाटणे बुधवारी खरेदी करावे. मंगळवार किंवा शनिवारी पोळपाट लाटणे खरेदी करू नका, समजा असे झाले तर घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते. काही ठिकाणी पोळपाट लाटणे खरेदी करण्यासाठी शुभमुर्हुत पाहिला जातो. पोळ्या लाटून झाल्यानंतर अनेकांना पोळपाट उलटा ठेवण्याची सवय आहे, यामुळे वास्तूदोष लागू शकतो. धनसंपत्तीची हानी तसेच घरात गरिबी येवू शकते. म्हणून पोळपाट कणकेच्या डब्यावर किंवा ओट्यावर उलटे ठेवू नये. काही घरांमध्ये असा पोळपाट वापरला जातो त्याचे दोन पाय तुटलेले असतात आणि दोन पायांवर पोळपाटाचे काम सुरू असते. यामुळे वास्तूदोष होवू शकतो. असा पोळपाट त्वरित बदलून टाका.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.