Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Garlic Price Hike: लागवड क्षेत्र आणि हवामान चांगले असल्याने उत्पादनातही वाढ होणार आहे. त्यामुळे नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर नव्या वर्षात लसणाचे दर कमी होतील, अशी माहिती लसणाचे व्यापारी समीर रायकर यांनी दिली.
मागील वर्षी लसणाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली होती. यंदाही लसूण उत्पादन कमी असल्याने काही दिवसांपासून घाऊक बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत लसणाची आवक कमी होत असल्याने उच्चांकी दर मिळाला आहे. दोन वर्षांपूर्वी लसणाला कमी दर मिळाला. त्यामुळे लसूण उत्पादक शेतकऱ्यांनी लसणाऐवजी इतर पीक घेण्यावर भर दिला. मार्केट यार्डातील बाजारात रोज पाच ते सात गाड्या लसणाची आवक होत आहे. ही आवक अपुरी आहे. बाजारात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि पंजाब येथून लसणाची आवक होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन लसणाची आवक सुरू होईल. फेब्रुवारीत आवक वाढेल. लागवड क्षेत्र आणि हवामान चांगले असल्याने उत्पादनातही वाढ होणार आहे. त्यामुळे नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर नव्या वर्षात लसणाचे दर कमी होतील, अशी माहिती लसणाचे व्यापारी समीर रायकर यांनी दिली.
मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला मतदान करा! बापासाठी लेकी मैदानात, काँग्रेस नेत्यांच्या मुली प्रचारात
लसणाचा राज्यभर तुटवडा
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांत मोठ्या प्रमाणात लसणाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, मागील दोन वर्षे लसणाला दर न मिळाल्याने गुजरातमधील लसूण लागवडीत मोठी घट झाली होती. शेतकऱ्यांनी लसणाऐवजी इतर पीकाला प्राधान्य दिले होते. इतर राज्यातही काही प्रमाणात उत्पादन घटले. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये लसणाचा तुटवडा जाणवत आहे.
Nashik : बिग फाइट, तिथेच वातावरण टाइट! मंत्री महाजन, भुसे, भुजबळ, पाटील अडकले मतदारसंघात
देशात लसणाचा तुटवडा जाणवत असताना 66 अफगाणिस्तानातून लसणाची आवक होत आहे. तेथून येणारा लसूण मुंबई, दिल्लीसह दक्षिण भारतातील राज्यांत जात आहे. या लसणामुळे काही प्रमाणात दर वाढीला आळा बसला आहे. अफगाणिस्तानातून लसणाची आवक झाली नसती, तर दरात आणखी मोठी वाढ झाली असती. – समीर रायकर, व्यापारी