Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ashok Murtadak joins Shiv Sena UBT : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या जाहीर सभेत अशोक मुर्तडक शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या जाहीर सभेत अशोक मुर्तडक शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राज ठाकरे यांच्या शनिवारी नाशकात दोन सभा होणार आहेत. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे गटाकडून राज ठाकरेंना चेकमेट करण्यात आले आहे.
अशोक मुर्तडक हे नाशिकमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्याऐवजी प्रसाद सानप यांना उमेदवारी देण्यात आल्याने मुर्तडक हे नाराज होते.
Vikram Nagare : गेम फिरला! भाजपच्या दोन नेत्यांनी पक्ष सोडला, ठाकरे शिवबंधन बांधणार, तोच पोलिसांची मोठी कारवाई
कोण आहेत अशोक मुर्तडक?
अशोक मुर्तडक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर नाशिक महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. २०१४ मध्ये नाशिकच्या महापौरपदासाठी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना संधी दिली. त्यांनी अडीच वर्ष नाशिकचं महापौरपद भूषवलं. अशोक मुर्तडक हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात.
Ashok Murtadak : राज ठाकरेंना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का, जवळच्या नेत्याने ऐन विधानसभेत साथ सोडली, शिवबंधन हाती
Devendra Fadnavis : २०१९ नंतर राजकारणात काहीच अशक्य नसतं, उद्धव ठाकरेंसोबत… फडणवीसांचं इंटरेस्टिंग उत्तर
मनसेचे कोण कोण ठाकरे गटात?
विधानसभा निवडणुकीच्या हंगामात आतापर्यंत मनसेच्या काही नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. नुकतंच अखिल चित्रे यांनी मनसेला रामराम ठोकून ठाकरे गटात प्रवेश केला. त्याआधी कीर्तिकुमार शिंदे, निलेश जंगमही मनसे सोडून ठाकरे गटात आले होते. तर पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरेही व्हाया वंचित बहुजन आघाडी ठाकरेंच्या शिवसेनेत आले होते.
दरम्यान, राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. ”आम्ही हे करु” अशा नावे मनसेचा चारकलमी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यात महिला सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, साहित्य-संस्कृती अशा विविध क्षेत्रांविषयी वचनं देण्यात आली आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या वचननाम्यावर भाष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करण्यापेक्षा विद्यामंदिरं उभी करणं गरजेचं आहे आणि गडकिल्ले संवर्धन करणं गरजेचं असल्याचं राज ठाकरे म्हणाले.