Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Assembly Election 2024: आगामी निवडणुकीसाठी यंदा किती उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत, याची सविस्तर आकडेवारी गुरुवारी जाहीर केली. या आकडेवारीत यंदा एकूण चार हजार १३६ उमेदवारांचे अर्ज सादर करण्यात आले आहे.

राजकीय पक्षांची आकडेवारी लक्षात घेतली तर यंदा बहुजन समाज पक्षातर्फे सर्वाधिक एकूण २३७ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तर जवळपास पाच पक्षांनी १००हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले असून त्यात भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचा समावेश असल्याचे निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
आगामी निवडणुकीसाठी यंदा किती उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत, याची सविस्तर आकडेवारी गुरुवारी जाहीर केली. या आकडेवारीत यंदा एकूण चार हजार १३६ उमेदवारांचे अर्ज सादर करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक अर्ज हे अपक्ष उमेदवारांनी भरले असून हा आकडा दोन हजार ८०६ इतकी आहे. या संपूर्ण यादीत एकूण १५८ राजकीय पक्षांचा समावेश आहे.
‘ओबीसी’ पंतप्रधान सहन होईना; PM मोदींचा छत्रपती संभाजीनगरच्या सभेत काँग्रेसवर जोरदार आरोप
कुणाचे, किती उमेदवार?
बहुजन समाज पक्ष २३७
वंचित बहुजन आघाडी २००
भारतीय जनता पक्ष १४९
महाराष्ट्र नवनिर्माण सेना १२५
अखिल भारतीय काँग्रेस १०१
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ५९
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ८६
शिवसेना ८१सख्खा भाऊच निघाला चोर! बहिणीच्या घरातून चोरले तब्बल ६.२१ लाखांचं सोनं, नाशिकमधील घटना
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ९५
माकप ३,
बहुजन रिपब्लिकन सामाजिक पक्ष २२
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ३२
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ४४
राष्ट्रीय समाज पक्षातर्फे ९३
प्रहार जनशक्ती पक्ष ३८
बविआ ८
भारत आदिवासी पार्टी ८
भीम सेना १४