Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
पुणे Online News दि. १२/११/२०२४ रोजी महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुक सन २०२४ चे अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो., कोंढवा पोलीस स्टेशन श्री विनय पाटणकर यांचे आदेशांन्वये कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सुजित मदन, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे असे पेट्रोलिंग करीत असताना पोहवा /६९५१ विशाल मेमाणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “चार इसम त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची होंडा अॅक्टीवा दुचाकी गाडी क्र.
एम.एच./१२/टी.क्यु./३३०२ व काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी गाडी क्र. एम.एच./१२/एस.ए./६२७० हिचे वरून खडीमशिन चौक येथून कात्रजच्या दिशेने जाणार असून त्यांच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्टल व काही जीवंत काडतुसे आहेत.” अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदरची बातमी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनय पाटणकर यांना कळविली असता त्यांनी योग्यत्या सुचना देवून कायदेशिर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या.
त्या अनुषंगाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व तपास पथकातील अंमलदार यांनी खडीमशिन चौकामध्ये सापळा लावला. रात्रौ ०२:०० वा चे सुमारास चार इसम त्यांच्या ताब्यातील दोन दुचाकी गाड्यांवरून पिसोळीच्या दिशेने येवून खडीमशिन चौकातील नविन रोडने इस्कॉन मंदिराच्या दिशेने जाताना दिसून आले. सदर इसम हेच बातमीतील इसम असल्याची खात्री झाल्यानंतर सदर चारही इसमांना खडीमशिन चौक येथून इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या नवीन रोडवर, सिमेंट प्लॉटच्या समोर, कोंढवा बु., पुणे येथे पोलीस स्टाफच्या मदतीने थांबवून त्यांना त्यांचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) स्वप्नील दगडू भिलारे, वय २६ वर्षे, रा. विठ्ठल मंदिर शेजारी, विठ्ठलवाडी, पौड, पुणे २) सलमान शेरखान मुलाणी, वय ३४ वर्षे, रा. चिन्मय हॉटेल समोर, खाटीक ओढा, पौंड, पुणे व ३) आदित्य संदिप मत्रे, वय १९ वर्षे, भरेगाव, ता. मुळशी, जि. पुणे एक विधी संघर्षग्रस्त बालक असे असल्याचे सांगितले. त्यांना एवढ्या रात्री कोठे गेला होता होता व व कोठे चलला आहात तसेच त्यांच्या जवळ काय आहे याबाबत विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांची अंगझडती घेतली असता इसम नामे स्वप्नील दगडू भिलारे याचे कमरेला मागील बाजुस एक देशी बनावटीचे पिस्टल खोवलेले व पँटचे पुढील बाजुच्या उजव्या खिशामध्ये ०२ जिवंत काडतुसे मिळुन आले. तसेच त्यांच्याकडे असलेल्या होंडा अॅक्टीवा दुचाकी गाडी क्र. एम.एच./१२/टी.क्यु./३३०२ या गाडीच्या डिकीमध्ये एकुण ०३ देशी बनावटीचे पिस्टल व एकुण ०४ नग जिवंत काडतुसे मिळून आली. त्यांच्याकडे परवाना आहे. अगर कसे याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर अग्नीशस्त्राचा परवाना त्यांच्याकडे नसल्याचे सांगिल्याने त्यांचे विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. १२५७/२०२४, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे ताब्यातून एक होंडा अॅक्टीवा दुचाकी गाडी व एक स्प्लेंडर दुचाकी गाडी तसेच एकुण ०४ देशी बनावटीचे पिस्टल, व ०६ जीवंत काडतुसे असा एकुण २,५८,०००/- रू किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असून विधीसंघर्षग्रस्त बालकास त्याचे पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त साो.. मा. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त साो., श्री रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त सो., पुर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो., परिमंडळ-५, श्री ए. राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त साो., वानवडी विभाग, श्री धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो.. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुरज बेंद्रे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री रौफ शेख यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सतिश चव्हाण, पोलीस नाईक गोरखनाथ चिनके, पोलीस अंमलदार सुजित मदन, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, सागर भोसले व शाहिद शेख यांच्या पथकाने केली आहे.