Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मनसे नेत्याच्या लेकीचा अमित ठाकरेंकडे ‘हा’ हट्ट, रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा केस बंद

6

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. ‘लोकसभेत शिवसेनेच्या प्रचारगीतातून ‘हिंदू धर्म’ आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ हे शब्द काढायला लावणारा निवडणूक आयोग हा भाजपचा नोकर आहे. परंतु, आता विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसच मतांचे धर्मयुद्ध करा, असे आवाहन जनतेला करीत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी आमचे शब्द गीतातून काढण्यास सांगणारा निवडणूक आयोग आता कुठे गेला आहे?’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील प्रचारसभेत केला आहे. बातमी वाचा सविस्तर…
२. विधानसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया जवळ आली असतानाच शिवसेना ठाकरे गटाने भाजपसह वंचित आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे. वंचित बहुजन समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्यासह भाजपच्या माजी नगरसेविका इंदूबाई नागरे, पल्लवी पाटील, मधुकर हिंगमिरे यांच्यासह भाजप कामगार आघाडीचा नेता विक्रम नागरे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘उबाठा’त प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेच्या उबाठाची शहरात ताकद वाढणार असली तरी यापैकी काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने त्याचा फटकाही बसण्याची शक्यता आहे.

३. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचं आव्हान असणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचदरम्यान, एका मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलीने अमित ठाकरेंना ”अमित काका आमदार बनायचंच” अशा आशयाचे पत्र दिलं आहे. बातमी वाचा सविस्तर…

४. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी येथील मातोश्री क्लबचे कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल कोर्टाने स्वीकारला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वायकर दाम्पत्याला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

५. ‘महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेवर विरोधकांनी टीका केली. परंतु, आता ते तीन हजार रुपये देणार, असे सांगत आहेत. खिशात काही नाही, मग ते कुठून देणार, कसे देणार, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी उपस्थित केला. याचवेळी ‘तुम्ही तब्बल चार वेळा मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण का दिले नाही,’ अशी टीकाही त्यांनी राष्ट्रवादी-शप पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर केली.

६. २००९च्या ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये महापौर म्हणून हरिश्चंद्र पाटील यांची निवड करण्यासाठी राज ठाकरे आणि मनसेकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे आमच्यासाठी ‘मातोश्री’ची दारे बंद झाली होती. ‘मातोश्री’ वर आम्हाला भेट नाकारण्यात आली. त्यावेळी ‘मातोश्री’ बाहेर एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेली अपमानास्पद वागणुकीनंतर शिवसेनेतील या बंडाची तेथून सुरुवात झाली’, असा गौप्यस्फोट ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी ‘मटा कट्टा’वर केला.

७. एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये एका लहान बाळाचा दोघांनी हात पकडलेला दिसत आहे. अद्याप रोहित आणि रितिका दोघांनी अजून जाहीरपणे आनंदाची बातमी सांगितलेली नाही. आता येत्या बॉर्डर गावस्कर मालिकेमधील पहिल्या कसोटी सामन्यासाठी रोहित जातो की नाही हे पाहावं लागणार आहे.

८. मराठीतले दिग्गज अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी सिनेसृष्टीत मोलाचे योगदान दिले होते. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यात केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमांचाही समावेश होता. श्रीराम लागू हे केवळ अभिनेतेच नसून डॉक्टरसुद्धा होते. पण एका जाहिरातीमुळे त्यांच्या डॉक्टरकीवरच गदा आलेली. आज श्रीराम लागू यांच्या जन्मदिनानिमित्त तो किस्सा जाणून घेऊ.

९. अखेरीस परदेशी गुंतवणूकदारांच्या भारतात परतण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेअर बाजारातील अलीकडच्या घसरणीमुळे हैराण झालेल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. जगातील प्रसिद्ध गुंतवणूक आणि ब्रोकरेज फर्म CLSA ने भारतातील गुंतवणुकीसंदर्भात एक अहवाल जारी केला आहे ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हास्य खिळू शकते. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीएलएसएने भारतापेक्षा चीनमध्ये गुंतवणूक करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातील चूक मान्य केली आहे. जागतिक ब्रोकरेज CLSA ने भारतीय शेअर बाजारातून बाहेर पडण्यापासून चीनमध्ये गुंतवणूक करण्याकडे आपला प्रारंभिक धोरणात्मक बदल केला आहे.

१०. मेडिकल कॉलेजच्या एनआयसीयूमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा आग लागल्याने तब्बल 10 अर्भकांचा मृत्यू झालाय. मृत्यूंची संख्या अजूनही वाढू शकते असे सांगितले जातंय. 37 मुलांना बाहेर काढण्यात आले आहे. वॉर्डात 50 हून अधिक बाळ दाखल होती. आगीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ही घटना उत्तर प्रदेशच्या झाशी येथील मेडिकल कॉलेजमधील एनआयसीयूमध्ये घडली. आगीची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. सिलिंडरच्या स्फोटामुळेच ही आग लागल्याचे सांगितले जातंय. बातमी वाचा सविस्तर…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.