Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune News: पुण्यातील पर्वती मतदारसंघात वारं फिरणार? मनसेचे जयराज लांडगे काय भूमिका घेणार?

5

Pune News: जयराज लांडगे यांनी स्थानिक गणेश मंडळे आणि मतदारसंघातील नागरिकांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली.

हायलाइट्स:

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं
  • पर्वती मतदारसंघात वारं फिरणार?
  • मनसेचे जयराज लांडगे काय भूमिका घेणार?
Lipi
मनसे जयराज लांडगे

आदित्य भवार, पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे आणि निवडणुकांमध्ये रंगत वाढताना दिसत आहे. यंंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे हे मात्र नक्की आहे. काही मतदारसंघांमध्ये अंतर्गत नाराजी दिसून येत आहे. तर काही ठिकाणी प्रमुख पदाधिकारी असमाधानी आहेत. लोकसभा निवडणुकीत कोथरूड आणि पर्वती मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मोठी आघाडी मिळाली होती. त्यावेळी इतर घटक पक्षांसोबत मनसेनेही बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, आता कोथरूडमध्ये मनसेचा उमेदवार आहे आणि पर्वतीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत मनसेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मनसेचे नेते जयराज लांडगे यांनी काल कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले आणि स्पष्ट निर्देश दिले की कार्यकर्त्यांनी ठोस कामगिरी करावी.
Ajit Pawar : ‘काय नातवाचा पुळका आलाय, मी काय खाताडा-पिताडा आहे का?’; अजित पवारांकडून मनातील खदखद व्यक्तजयराज लांडगे यांनी स्थानिक गणेश मंडळे आणि मतदारसंघातील नागरिकांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “माधुरी मिसाळ तीन टर्म म्हणजे १५ वर्ष आमदार राहिल्या. परंतु त्या कधीही कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी पुढे आल्या नाहीत. मतदारसंघात दिसल्याचंही क्वचित घडलं आहे. त्यामुळे स्थानिक लोकांची कामे झालेली नाहीत. आता पर्वती मतदारसंघात परिवर्तनाची गरज आहे.”

लांडगे पुढे म्हणाले, “पर्वती मतदारसंघात १५ वर्षांनंतर बदल होणे आवश्यक आहे. अश्विनी कदम या अशी व्यक्ती आहे, त्या फक्त पतीच्या आधारावर निवडणून येणाऱ्या आमदार नाही. त्या स्वतः घरोघरी जाऊन चांगलं काम करत आहेत. त्यामुळे लोकांचं मत आहे की त्यांना एक संधी दिली पाहिजे. बैठकीत पर्वती मतदारसंघातील २०० गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि स्थानिक लोक उपस्थित होते. आमच्या मतांनुसार आणखी काही कार्यकर्ते अश्विनी कदम यांना पाठिंबा देतील. मात्र, हा संपूर्ण अहवाल तयार करून आम्ही राज ठाकरे यांच्याकडे सादर करू, आणि अंतिम निर्णय ते घेतील” अशी प्रतिक्रिया जयराज लांडगे यांनी दिली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.