Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ajit Pawar In Baramati : अजित पवारांनी बारामतीमध्ये ग्रामस्थांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी साहेब निवडणुकीला उभे नसताना त्यांचे बॅनर लावल्याचं म्हणत जनतेला भावनिक न होण्याचं आवाहन केलं आहे.
Sharad Pawar : मला त्या रस्त्याने जायचे नाही, पण तुम्हाला दम दिला तर मला कळवा; शरद पवार आक्रमक, नेमकं घडलं तरी काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार योगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ बारामतीत काल महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला हजारो महिलांनी सहभाग नोंदवला. मात्र या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना पाचशे रुपये देऊन कार्यक्रमाला बोलावलं असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.
उद्धव ठाकरेंच्या सभेची तयारी सुरू, मुख्यमंत्र्यांनी कारचा स्पीड कमी करुन वाकून पाहिलं…; फोटोची एकच चर्चा
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, की अजून तर यांना काहीही माहित नाही. जेवणावळी सुरू झाल्या आहेत. मला कोणीतरी म्हटलं.. हे पण…सुरू झालं आहे…. असे हातवारे करत त्यांनी तुम्ही कोणत्या रस्त्याने बारामतीकरांना नेत आहात. मी बारामती एकजूट ठेवण्याचा प्रयत्न केला. कुटुंब म्हणून मी बारामतीला आधार देत आहे. मात्र तुम्ही स्वतःच्या स्वार्थाकरता बारामतीकरांना चुकीचा रस्ता दाखवताय, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
Pune News : आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत का? भर सभेत अजितदादांनी शरद पवारांच्या एक्क्याला फैलावर घेतलं
बारामतीत अशी पद्धत कधीही नव्हती. सुरुवातीला तुम्हाला बरे वाटेल! उद्याच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत काय होईल. याने सवय लागते. लोक म्हणतील तेव्हा दिले आता काय होतेय, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, मार्केट कमिटी, विकास सोसायटी, बारामती बँक, पिडीसीसी बँक या निवडणुकीला लोक पैसे मागतील. त्यामुळे ही पद्धत योग्य नाही, असेही यावेळी म्हणाले.
साहेबांचे भले मोठे फलक.!
सध्या भावनिक करायचं काम चालू आहे. दोन-तीन गावांमध्ये पवार साहेबांचे भले मोठे फलक लावण्यात आले आहेत आणि त्या फलकावर निवडणूक निशाणी लावण्यात आली आहे. या निवडणुकीत साहेब उभे आहेत का..? असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, साहेब उभे होते तेव्हा त्यांना भरघोस मते दिली. सुरुवातीला कमी मते मिळाली. मी कामाला सुरुवात केल्यावर नव्वदच्या निवडणुकीत लाखाच्या फरकाने साहेबांना निवडून दिले, असे ते म्हणाले.
Ajit Pawar : पवार साहेबांचे भले मोठे फलक लावले, निवडणुकीत साहेब उभे आहेत का? अजितदादांचा सवाल, भावनिक होऊ नका; दादांचं आवाहन
भावनिक होऊ नका.!
भावनिक होऊ नका.! लोकसभेला साहेबांना तुम्ही खुश केलं..! साहेबांपेक्षा जास्त कामे मी बारामतीत केली आहेत. अर्थात तुम्ही मला पाठिंबा आणि साथ दिली म्हणून मी हे सर्व करू शकलो..! मी कामाचा माणूस आहे. मला काम करायला आवडतं, असंही अजित पवार म्हणाले.