Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आंबेडकर समाजविरोधी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा खळबळजनक आरोप

4

Nana Patole is Against Ambedkar Ideology: काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो. राजकारणात संधी देताना त्यांना याचा विसर पडतो, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स

म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसमधील आंबेडकरी विचारधारा असलेल्या उमेदवाराला मिळणे अपेक्षित होते. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंबेडकरी कार्यकर्त्याला संधी दिली नाही. काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो. राजकारणात संधी देताना त्यांना याचा विसर पडतो, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी केला. यासंदर्भात पटोले यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

भंडारा येथे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते परमानंद मेश्राम, प्राचार्य पूरण लोणारे, प्राणहंस मेश्राम, अ‍ॅड. निलेश डहाट, प्रज्ञा नंदेश्वर, भीमराव मेश्राम यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. परमानंद मेश्राम म्हणाले, अनेक दशकांपासून पटोले आंबेडकरी समाजविरोधी भूमिका घेत आहेत. परंतु, इतक्या वर्षांनंतरही आंबेडकरी समाज पटोलेंचा डाव समजू शकला नाही. जगाने दखल घेतलेल्या खैरलांजी हत्याकांडावेळी पटोले यांनी ‘खैरणा ते खैरलांजी’ अशी पदयात्रा काढून आंबेडकरी समाजाविरोधी भूमिका घेतली होती. काँग्रेसला आंबेडकरी समाजाची मते हवी आहेत. परंतु, या प्रवर्गाला नेतृत्व देण्याची संधी मिळते तेव्हा काँग्रेस ती नाकारते. डोक्यावर संविधान ठेवून आंबेडकरी समाज काँग्रेसला साथ देईल, असा भ्रम काँग्रेसला झाला आहे. आमची संधी नाकारणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशाराही मेश्राम यांनी दिला.
मोदीजी राहुल गांधींची बहीण सांगते, बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी पण… प्रियंका गांधींचा पलटवार
भंडारा विधानसभा क्षेत्रात अनुसूचित जाती प्रवर्गाचे मतदार ९० हजारांपेक्षा अधिक आहेत. परंतु, आंबेडकरवादी विचारधारा असलेल्या व्यक्तीला काँग्रेस उमेदवारी देत नाही. फक्त जातीय राजकारण करून विशिष्ट जातीला पटोले जवळ करतात. अशा जातीयवादी नेत्यांना समाजाने त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहनही मेश्राम यांनी केले.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.