Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे महाजन हे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे याच्या ‘टार्गेट’ वर असल्याने मतदारसंघावर प्रभाव असणाऱ्या मराठा समाजाचा कौल कुठल्या बाजूला जातो, यावर निवडणुकीच्या विजयाचे गणित अवलंबून आहे
सन १९९५ नंतर गिरीश महाजन यांना सातत्याने विजय मिळाल्यामुळे या जागेला भाजपचा अभेद्य किल्ला मानले जाते. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकांत जामनेरमध्ये गिरीश महाजन यांनी सहाव्यांदा आपली दावेदारी केली होती. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीकडून संजय गरूड रिंगणात होते. महाजन यांनी १,१४,७१४ मते घेत विजय मिळवला. संजय भास्करराव गरूड यांना ७९,७०० मतांवर समाधान मानावे लागले. मात्र, पारंपरिक विरोधक असलेले संजय गरूड यांनाच भाजपमध्ये घेऊन महाजन यांनी प्रचाराच्या कामाला लावण्यात यश मिळविले.
गरूड यांना भाजपमध्ये घेऊन महाजन यांनी विधानसभेची लढाई जिंकली असे वाटत असतानाच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमधील ज्येष्ठ पदाधिकारी गिरीश महाजन यांच्याबरोबर काम करणाऱ्या खोडपे यांना आपल्या गोटात घेऊन त्यांना उमेदवारी देत महाजनांची खेळी त्यांच्यावरच उलटवली. खोडपे जनतेतील चेहरा असून, मराठा समाजाचे आहेत. शरद पवार यांनी रचलेल्या या चक्रव्यूहात अडकलेले महाजन तो भेदून विजयाचे तोरण बांधतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकीकडे महाजन हे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे याच्या ‘टार्गेट’ वर असल्याने मतदारसंघावर प्रभाव असणाऱ्या मराठा समाजाचा कौल कुठल्या बाजूला जातो, यावर निवडणुकीच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.
Pankaja Munde: भिंती उभ्या करण्याऐवजी एकी गरजेची; ‘बटेंगे तो कटेंगे’ विवादानंतर पंकजा मुंडेंचे वक्तव्य
कळीचे मुद्दे
■ रखडलेले टेक्सटाइल पार्क
■ शेतीच्या सिंचनाचा प्रश्न
■ कापूस, सोयाबीनला भाव नाही, केळी उत्पादकांचे प्रश्न
मातोश्रीची दारे बंद, आम्हाला भेट नाकारलेली, शिंदेंच्या अपमानाचा मी साक्षीदार! प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट
सन २०१९ च्या निकालाची स्थिती
■ गिरीश महाजन (भाजप): १,१४,७१४
■ संजय गरुड (राष्ट्रवादी काँग्रेस) : ७९,७००
■ एकूण मतदार ३,३५,२७४
पुरुष : १,७२,२३२
महिला : १,६३,०४१
तृतीयपंथी : १