Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nashik Vidhan Sabha: नाशिकमध्ये आमच्या दिनकर पाटील यांना निवडून दिल्यास आयटी पार्क आणेन. त्यामुळे मुलांना रोजगार मिळेल. हा माझ्या आवडीचा विषय आहे. मला मुख्यमंत्रिपदाची हाव नाही, तर माझे राज्य मोठे झाले पाहिजे असे मला वाटते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
नाशिकमध्ये आमच्या दिनकर पाटील यांना निवडून दिल्यास आयटी पार्क आणेन. त्यामुळे मुलांना रोजगार मिळेल. हा माझ्या आवडीचा विषय आहे. मला मुख्यमंत्रिपदाची हाव नाही, तर माझे राज्य मोठे झाले पाहिजे असे मला वाटते, असे राज ठाकरे यांनी सांगितले. नाशिक पश्चिम मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारासाठी सातपूरमधील शिवजन्मोत्सव मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत जे राजकारण खेळले गेले, त्यात कुठेही तुमचा विचार झाला नाही. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले. तुम्ही ज्यांच्या विरोधात मतदान केले, ते सत्तेत आले. काही जण पैसे घेऊन स्थलांतरित झाले. काहींनी तर पक्षच घेऊन दुसऱ्याबरोबर सत्तेत गेलेत. गेली पाच वर्षे स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळे राजकारण सुरू होते. तुमच्या प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये, यासाठी यांनी जातीपातीचे विष तुमच्यात पेरले.
मी मुख्यमंत्रिपद घेतले नसते !
सन २०१९ मध्ये जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता; परंतु उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी तुम्हाला विश्वासात न घेताच, अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मागितले. भाजपचा मुख्यमंत्री होत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी पिळायला सुरुवात केली. मला मुख्यमंत्री करा एवढाच स्वार्थाचा विचार त्यांनी केला असा आरोप करत, मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो, तर मुख्यमंत्रिपद मागितले नसते असे त्यांनी सांगितले. मला मुख्यमंत्रिपद नको, मी तुमच्याबरोबर येतो पण मी सांगेन त्या गोष्टी झाल्या पाहिजेत, असे मी त्यांना ठणकावून सांगितले असते, असे ठाकरेंनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला सन १९७३ ची गोष्ट आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एकदा शिवसेनेच्या कार्यालयातून इतरत्र जाण्यासाठी बाहेर पडत होतो.
आमचा वाहनचालक न आल्याने टॅक्सी थांबवित असताना समोरून इम्पाला या इंपोर्टेड गाडीत तेव्हाचे मुंबईचे महापौर सुधीर जोशी समोर आले. पुन्हा कार्यालयात जाऊन त्यांनी बाळासाहेबांशी वार्तालाप केला. पुन्हा बाहेर येताना आग्रह धरला माझ्या लाल दिव्याच्या गाडीतून तुम्हाला हवे तेथे सोडतो. बाळासाहेबांनी स्पष्ट नकार देत टॅक्सीत बसले. आमची टॅक्सी पुढे धावत असताना लाल दिव्याची गाडी मागे-मागे येत होती कारण, त्या लाल दिव्याच्या गाडीतले महापौर त्यांची गाडी सोडून आमच्या टॅक्सीत बाळासाहेबांच्या शेजारी बसले होते. हे चित्र मी केवळ सहा वर्षांचा असताना प्रत्यक्ष अनुभवले आहे. अशा माणसाला मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी, अशी अभिलाषा राहणार का? असे सांगत राज यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
Ajit Pawar: वयोमानानुसार साहेबांना समजून घ्यायला हवे; गद्दार टिप्पणीबाबत अजित पवारांचे मत
शरद पवार तालुक्याचे पुढारी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे नाही, तर तालुक्याचे पुढारी आहेत. असे नसते तर राज्यामध्ये त्यांनी उद्योग आणले असते. केवळ बारामतीचेच कल्याण का केले ? या तुलनेत उर्वरित महाराष्ट्र जाती-पातीमध्ये विभागून ठेवला. अगोदर मराठा-ब्राह्मणवाद आणि आता मराठा-ओबीसी वाद पेरून राज्यातील मूलभूत प्रश्नांपासून जनतेला ते भरकटवू पाहत आहेत. जनतेने हे लक्षात घ्यावे. महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय तापला जात नसून, तो तापविला जात असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा आगडोंब! मंत्री, आमदारांच्या घरांवर हल्ला, इम्फाळ खोऱ्यात संचारबंदी
उत्तर प्रदेश, बिहार करायचा का?
राज्यात जातीपातीमंध्ये द्वेष निर्माण केला जात आहे. प्रत्येकाला जातीचा अभिमान असला पाहिजे. मात्र, तुमच्या डोक्यातील स्क्रू फिट झाला पाहिजे असे सांगत, मराठवाड्यातील एका कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याला चौथा खांदेकरी मिळाला नाही, अशी दुर्दैवी घटना घडली आहे. सहा तासांनंतर तिरडीला चौथा खांदा मिळाल्यानंतर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाले. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जातीपातीचे राजकारण होते. त्यामुळे महाराष्ट्रालाही उत्तर प्रदेश, बिहार करायचा का, असा सवाल करत ‘महाराष्ट्र म्हणून एक व्हा,’ असे आवाहन त्यांनी केले.