Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कबाहेर रोखलं, कन्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सत्ता आहे म्हणून…’
Supriya Sule on Pratibha Pawar Textile Park : शरद पवारांच्या पत्नीला टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवण्याचा प्रकार घडला आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे बीडमधील मविआ उमेदवाराच्या प्रचारासाठी आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रतिभा पवार यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल बोलाताना खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, माझी आई प्रतिभा पवार आणि माझी मुलगी रेवती सुळे या दोघी बारामतीतल्या टेक्सटाइल पार्कमध्ये गेल्या होत्या. त्याठिकाणी त्यांना अर्धा तास थांबवून ठेवण्यात आल्याची मला माहिती समजत आहे. योगायोग बघा ना, ज्या शरद पवारांनी बारामतीत हे पार्क उभं केलं, त्या शरद पवारांच्या पत्नीला अर्धा तास त्याठिकाणी थांबवलं जात आहे. आता सत्ता त्यांच्या हातात आहे तर ते लोकांना कसेही वागवू शकतात.’
Pratibha Pawar: शरद पवारांच्या पत्नीला बारामती टेक्सस्टाईल पार्क बाहेर रोखलं; मिसेस पवारांचा सॉल्लिड सवाल
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत. ऐन निवडणुकीत त्यांच्या टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवारांसोबत हा प्रकार घडल्याने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रतिभा पवार आपली नात रेवती सुळेंसह शॉपिंगसाठी टेक्सटाईल पार्क मध्ये आल्या होत्या. यावेळी गेटवरच त्यांची गाडी अडवण्यात आली. त्यांची गाडी दिसताच गेट बंद करण्यात आला असा दावा करण्यात येत आहे. गेटवर असलेल्या सुरक्षारक्षकानेही आम्हाला वरुन आदेश आल्याने गेट लावला, असे म्हटले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.
नुकताच अजित पवारांनीही प्रतिभा पवार करत असलेल्या प्रचाराबद्दल अजित पवारांनी एका मुलाखतीत आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर हा प्रकार घडल्याने बारामतीत आता चर्चा रंगू लागल्या आहेत. कुटुंबातील कलहामुळे बारामतीतील यंदाची निवडणूक धारदार बनली आहे. यामुळे आता उघडपणे भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालावर आता सर्व अवलंबून असणार आहे.